• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सकाळी ऑफिसला जायच्या धावपळीत पटकन बनवा पनीर भुर्जी सँडविच; जाणून घ्या रेसिपी

July 4, 2026 by admin Leave a Comment


सकाळी बहुतेक जणांना कामाला जाण्याची घाई असते. कामाला जायच्या घाईत नाश्ता टाळणे नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे सकाळच्या सुमारास नाश्ता करून कामाला जाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. हेल्दी आणि चविष्ट नाश्ता हवा असेल, तर तुम्ही पनीर भुर्जी सँडविच तयार करू शकता. तुम्ही अवघ्या 10 मिनिटांत हा नाश्ता तयार करू शकता. पनीर भुर्जी सँडविच करणे फार सोपे आहे. या पदार्थाची रेसिपी जाणून घ्या.

साहित्य

पनीर : 200 ग्रॅम
ब्रेड : 4 ते 6 स्लाइस
कांदा : 1 बारीक चिरलेला
टोमॅटो : 1 बारीक कापलेला
हिरवी मिरची : 1 बारीक चिरेलली
कोंथिबीर : बारीक चिरलेली
मसाले : 1/2 चमचे हळद, 1/2 चमचे लाल तिखट, 1/2 चमचे गरम मसाला,
चवीनुसार मीठ
लोणी : बेकिंग आणि स्वयंपाकासाठी
हिरवी चटणी किवा टोमॅटो कॅचप

कसा तयार कराल?

स्टेप 1

सर्वात आधी तव्यावर चमच्याने तेल किंवा बटर गरम करा. त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा टाकल्यानंतर तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्यावा. नंतर टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावा.

स्टेप 2

तव्यावर हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ घालावे. नंतर मंद आचेवर 3O सेकंदात मसाले परतून घ्यावे. आता मॅश केलेले पनीर चांगले मिसळून घ्यावे. पनीर मसाल्यासोबत 2 मिनिटे परतून घ्यावे. त्यानंतर वरतून बारीक कापलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद करावा. तुमची पनीर भुर्जी तयार झाली आहे.

स्टेप 3

ब्रेडचे दोन स्लाइस घ्यावे. त्यानंतर लाल तिखट आवडत असेल, तर स्लाइसवर हिरवी चटणी लावावी. दुसर्‍या स्लाइसवर टोमॅटो कॅचप लावावा. आता ब्रेडवर तयार केलेली पनीर भुर्जी टाकावी. त्यावर आता दुसरा ब्रेड टाकावा.

स्टेप 4

तवा किंवा सँडविच मेकर हा गॅसवर गरम करावा. त्यानंतर त्यात थोडेसे बटर टाकावे. तुमच्याकडे तवा असल्यास सँडविचला तव्यावर ठेवून मंद किंवा मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत गरम करा. आता तुमचा गरमागरम कुरकरीत सँडविच तयार झालाय. तुम्ही  चहासोबत सँडविच खाऊ शकता. तुम्ही कॉफीसोबत देखील सँडविचचा आस्वाद घेऊ शकता.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये आक्रमक फलंदाजी करू शकत नाही? सॅम करनचं मोठं विधान
  • एका रात्रीत या सीरिजचं बदललं नशीब, बनली नंबर-1, पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी
  • Ketan Murder Case: बस्स झाला अत्याचार…राष्ट्रीय पुरूष आयोग हवाच! केतन अग्रवाल खून प्रकरणात भाजप खासदाराची मोठी मागणी
  • मखाना फक्त भाजून खाताय! जाणून घ्या सुपरफूड मखाना खाण्याचे 5 आरोग्यदायी मार्ग
  • चामड्याच्या पट्ट्याने ते मारायचे… नागराज मंजुळेच्या पहिल्या बायकोचे गंभीर आरोप, ती सध्या काय करते?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in