• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सकाळीच शरद पवारांचा फोन आला, मोठा गेम ठरला, आता फुटीर खासदारांच्या मतदार संघात शरद पवारही… नेमकं काय घडणार?; संजय राऊतांनी सांगितला प्लान

June 18, 2026 by admin Leave a Comment


शिवसेनेकडून पक्षाच्या सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला. 11 वाजता बैठक आहे. पक्षातील 6 खासदारांच्या फुटीवर हा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेच्या 6 खासदारांनी बंडखोरीचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. लोकसभा अध्यक्षांना त्यांनी नवीन गटाकरिता पत्रही दिले. मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. दिल्लीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित आहेत. पक्षाने व्हिप जारी करूनही बैठकीत दाखल न होणाऱ्या खासदारांविरोधात कारवाई केली जाणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांना अज्ञातस्थळी हालवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काल हे खासदार दिल्लीत होते, त्यानंतर त्यांनी दिल्ली सोडल्याची माहिती आहे. श्रीकांत शिंदे दिल्लीत ठाण मांडून आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात आहेत, त्यांनी भिवंडीत नगरसेवकांसोबत संवाद साधला. दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

यादरम्यानच संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत मोठे आरोप केले. संजय राऊत यांनी म्हटले की, महाराष्ट्राचा गोलपीठा झाला हे तुम्हीही मान्य केलं पाहिजे. देशाच्या राजकारणाचा गोलपीठा झाला त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे. हे मान्य केलं पाहिजे. जे पेजेला जाईल त्याच्या शेजेला जातात, ही प्रवृत्ती वाढत राहिली तर महाराष्ट्राचो गोलपीठा झाला आहे. शिंदे गटाचे हे दलाल आहेत.

हे गोलपीठातील दलाल आहेत. हे दलाल निर्माण करण्याचं काम भाजपने केलं आहे. देशाच्या संस्कृतीला काळीमा फासणारं आहे. उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. शरद पवारांचा फोन आला होता. आता कोणी बेईमानी करणार असतील तर त्यांना सोडायचं नाही. त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे. पवार म्हणाले, मी स्वत सभा घेईन. कोणताही खासदार फुटला तर त्याला मोकळीक देणार नाही. त्यात राष्ट्रवादीही असतात.

एकप्रकारे हा इशारा बंडखोरी करणाऱ्या खासदारांना देण्यात आला. फक्त शिवसेना ठाकरे गटच नाही तर बेईनामी करणाऱ्या खासदारांना सोडणार नसल्याचे फोनवर शरद पवार यांनीही म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या फुटीवर आता शरद पवारांची राष्ट्रवादी देखील अलर्ट मोडवर असल्याचे बघायला मिळत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारताला ज्याची भीती तेच धडले, मोठे नुकसान, थेट इराणसोबतच..
  • Sunil Gavaskar: भारतात हे घडलं असतं तर…गावस्कर ICCवर संतापलं, एका झटक्यात केली पोलखोल
  • मोठी बातमी! नागपूर हादरलं, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार
  • Sugar Rate : आता नो टेन्शन! सरकारच्या त्या निर्णयाने साखरचे दर धडाम, खरेदीदारांना मोठा दिलासा
  • LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in