• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संजय दिना पाटलांच्या अडचणी वाढणार? गुणरत्न सदावर्तेंनी सांगितला तो एक पर्याय; म्हणाले बोंब मारून…

June 25, 2026 by admin Leave a Comment


Sanjay Dina Patil : संजय दिना पाटील यांच्या प्रकरणात मी पत्रकारांसोबत आहे. पत्रकारांनी निसंकोचपणे समोर यावं. मी त्यांच्यासोबत जाईल. जितेंद्र आव्हाड योग्य बोलले. संजय दिना पाटील यांना काहीच माहिती नाही. संजय दिना पाटील यांना रेडिमेड सगळं मिळालेलं आहे. त्यांना संघर्ष माहिती नाही. त्यांना लोकशाही माहिती नाही, असा हल्लाबोल गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

राजकीय पक्षांनी निषेध करायला हवा

तसेच, मी या मटेरियलला ओळखत नाही. असं मटेरियल महाराष्ट्रात चालत नाही. सामान्य मराठी भाषेत संजय दिना पाटील यांचं असं बोलणं म्हणजे माजलेपणाचं लक्षण आहे. अशा घटनेचा सगळ्यांनी सगळ्या राजकीय पक्षांनी निषेध करायला हवा, असा सल्लाही गुणरत्न सदावर्ते यांनी दिला. तसेच माझा कधी संजय दिना पाटील यांच्याशी संबंध आलेला नाही. पण हा प्रकार निंदनीय आणि निषेधार्ह आहे. असं वैचारिक महाराष्ट्रात चालत. महाराष्ट्र हे खपवून घेत नाही. संजय दिना पाटील लोकप्रतिनिधी आहेत. ते लोकांचे सेवक आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

पोलिसांनी या प्रकरणात थेट गुन्हा दाकल करावा

देशात संविधान लागू झालं तेव्हापासून देशातली सगळी दादागिरी, पाटीलकी संपली. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पोलिसांनी या प्रकरणात थेट गुन्हा दाकल करावा. राजकारण्यांची चिंता करू नये. असेच चालू राहिले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नाव शिंदे टोळी असे पडेल, असेही संजय दिना पाटील म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी क्रिमिनल कायद्यानुसार कारवाई करावी

पाच खून कोणाचे केले ते संजय दिना पाटील यांना सांगावे लागेल. पोलिसांनी त्याचा तपास करावा. आज एकनाथ शिंदेंनी संजय दिना पाटील यांना बोलावून घेऊन पत्रकारांसमोर उभे करायला हवं होतं. मुख्यमंत्र्यांनी क्रिमिनल कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली. तसेच पत्रकाराच्या केसाला धक्का लागला तर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, असे खुले आव्हानच सदावर्ते यांनी संजय दिना पाटील यांना केले.

संजय दिना पाटील विरोधात गुन्हा दाखल करावा

शेवटी, संजय दिना पाटील यांचा बोंब मारून मी निषेध व्यक्त करतो. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करावा आणि मी संजय दिना पाटील विरोधात गुन्हा दाखल करायला तयार आहे. मी पत्रकारांसोबत आहे, असेही यावेळी सदावर्ते यांनी सांगितले. दरम्यान, आता संजय दिना पाटील या प्रकरणी माफी मागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप
  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल
  • मुंबई पोलिसांचा मोठा दणका! तब्बल 3 दशकं चकवा देणारे दोन अट्टल गुन्हेगार गजाआड
  • Asian Games: भारत पाकिस्तान यांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, नेमकं काय झालं? वेळापत्रक समजून घ्या
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in