• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

“संघर्ष हा वंचित, बंजारा समाजाच्या पाचवीलाच पूजलेला..”; सेन्सॉर बोर्डाने चालवली ‘द महाराष्ट्र फाईल्स’वर कात्री, दिग्दर्शक अडचणीत

May 29, 2026 by admin Leave a Comment


गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘द महाराष्ट्र फाईल्स’ या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या 29 मे रोजी प्रदर्शित होणारा ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्यामुळे आता या दिवशी प्रदर्शित होणार नसल्याचं समोर आलंय. मात्र लवकरच नव्या तारखेसह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सेन्सॉर बोर्डाच्या विलंबामुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर गेल्याने निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. बंजारा समाजाच्या न्यायासाठी लढणारा हा चित्रपट असून याच्या प्रदर्शनाच्या तारखेकडे आता प्रेक्षकांचंही लक्ष लागून राहणार आहे. चित्रपटाची टीम आलेल्या अडथळ्यावर काम करत असून लवकरच प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करतील, अशी माहिती समोर येत आहे.

‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरला सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. यानंतर प्रेक्षकांना 29 मे ची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही सीन्सवर कात्री चालवल्याने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. असं असलं तरी आता प्रेक्षकवर्गाला जास्त काळ वाट पहावी लागणार नाही, कारण हा चित्रपट जून महिन्यातच प्रदर्शित होईल, असं समजतंय.

चित्रपटाच्या तारखेबाबत निर्माते आणि दिग्दर्शक संजीवकुमार राठोड यांनी म्हटलंय, “संघर्ष हा वंचित आणि बंजारा समाजाच्या पाचवीलाच पूजलेला आहे. संघर्षाला सामोरे जाऊन येत्या जून महिन्यातच हा चित्रपट महाराष्ट्राच्या तमाम जनतेला चित्रपटगृहात पाहायला मिळेल.” ‘द महाराष्ट्र फाईल्स’ची निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, कथा, पटकथा अशी सर्व बाजूंनी चित्रपटाची धुरा संजीव कुमार राठोड यांनी सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि सह निर्माते म्हणून शालिनी राठोड यांनी बाजू सांभाळली आहे.

या चित्रपटात दिग्गज कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील, मंगली ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली आहे. लवकरच चित्रपटाची नवी तारीख घोषित करण्यात येईल, तोवर मात्र प्रेक्षकांना वाट पाहावी लागेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in