• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संकट चार दिवसाने लांबलं… अंदमान निकोबार ते महाराष्ट्र व्हाया केरळ… पावसाची मोठी अपडेट काय?

May 26, 2026 by admin Leave a Comment


राज्यासह देशभरातील जनतेसाठी महत्त्वाची बातमी आहे. मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला असला तरी तो अद्याप पुढे सरकलेला नाही. मान्सून केरळमध्ये आज दाखल होण्याची शक्यता होती मात्र तो अंदमान निकोबार बेटे थांबला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आता मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस घेण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाचीही शक्यता वर्तवण्याच आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मान्सून लांबला

पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेचा लाटेचा इशारा दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. यावर्षी मान्सून केरळमध्ये आज दाखल होण्याची शक्यता होती मात्र तो अंदमान निकोबार बेटे थांबलेला असून त्यावरचे परीक्षण चालू असल्याची माहिती समोर आली आहे. आता येत्या चार दिवसात मान्सून केरळात दाखल होणार असल्याची समोर आली आहे.

राज्याच्या या भागात उष्णतेचा कहर

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासात अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची आणि तुरळ ठिकाणी रात्री उष्णता राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे. याबाबतचा अलर्ट ग्राहकांना मोबाईलवर पाठवण्यात आला आहे. त्यामुळे ही उष्णतेची लाट भयंकर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी असाही संदेश हाय अलर्ट पद्धतीने या संदेशाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

नंदुरबारमध्ये पारा घसरला मात्र उकाडा कायम

नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा काहीसा कमी झाल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली असली तरी नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या जिल्ह्यात तापमान 37 ते 38 अंश सेल्सियसपर्यंत नोंदवले जात असून त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. वाढत्या उकाड्यामुळे विजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी वारंवार वीज खंडित होण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत तापमान स्थिर राहण्याची शक्यता असली तरी हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in