• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रेवती सुळेच्या लग्नात क्रिकेटर रिंकू सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा बोलबाला

June 23, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे शनिवारी 20 जून रोजी लग्नबंधनात अडकली. नागपूरचे उद्योजक सारंग लखानी आणि रेवती सुळे यांचा विवाहसोहळा मुंबईत पार पडला. या लग्नसोहळ्याला राजकीय, सामाजिक, कला आणि क्रिकेट क्षेत्रातील अनेकजण उपस्थित होते. अशातच समाजवादी पार्टीच्या खासदार आणि क्रिकेटर रिंहू सिंहची होणारी पत्नी प्रिया सरोज यांनी सर्वांचं लक्ष वेधलं.

प्रिया सरोज यांनी रेवती सुळेच्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. प्रिया सरोज नेहमीच त्यांच्या साध्या आणि सहज अंदाजामुळे चर्चेत असतात. आता रेवतीच्या लग्नातही त्यांचा साधा पण तितकाच आकर्षक लूक चर्चेत राहिला. यावेळी त्यांना मेहंदी रंगाची रेशमी साडी नेसली होती.

लहान मोत्यांचं सुंदर भरतकाम केलेली काठ आणि हलकीशी चमक.. अशी ही प्रिया सरोज यांची खास साडी होती. या साडीमुळे त्यांचा लूक अधिकच खास दिसत होता. हा लूक अधिक खुलवण्यासाठी त्यांनी त्यावर कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता.

या लग्न समारंभातील एका खास क्षणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. प्रिया सरोज जेव्हा वधू-वराला भेटण्यासाठी मंचाजवळ उभ्या होत्या, तेव्हा सुप्रिया सुळे तिथे आल्या आणि त्यांनी प्रिया यांचा हात धरत त्यांना पुढे मंचाजवळ नेलं. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

प्रिया सरोज लवकरच क्रिकेटर रिंकू सिंहशी लग्न करणार आहेत. 8 जून रोजी लखनौ इथं या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशाच्या विविध भागांमधून निवडून आलेल्या सर्वांत तरुण महिला खासदारांपैकी एक प्रिया सरोज होत्या. त्यावेळी त्यांचं वय फक्त 25 वर्षे होतं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • थलपती विजय यांचं विधानसभेत ‘सिनेस्टाइल’ भाषण; ‘ती’ कृती करताच टाळ्यांचा कडकडाट
  • जपमाळेत 108 मणीच का असतात, काय आहे संख्येचं महत्त्व?
  • खासदार निधीचं काय केलं? ओमराजे आले अन् थेट हिशोब मांडला, त्या आरोपांना दिला मुद्देसूद उत्तर!
  • ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांबाबत सर्वात मोठी अपडेट! महाराष्ट्र नाही आता दिल्लीतील…नेमका निर्णय काय?
  • टीझर लीकनंतर 4 दिवसांनी श्रद्धाने शेअर केले ‘Eatha’चे नवे पोस्टर्स, कसा आहे टीझर?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in