• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी गॉलमध्ये भारतीय संघाने फडकवला तिरंगा, बीसीसीआयने Video केला शेअर

August 15, 2026 by admin Leave a Comment

भारत श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना गॉलमध्ये होत आहे. या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि मनासारखा निर्णय घेता आला. भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासाठी हा महत्त्वाचा आणि विशेष सामना आहे. कारण भारतीय कसोटी क्रिकेटमधील 600वा कसोटी सामना आहे. त्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचं औचित्य आहे. त्यामुळे हा सामना भारतीय क्रिकेटर्स आणि क्रीडाप्रेमींसाठी खास असणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वी भारतीय संघाने गॉलमध्ये तिरंग फडकवून देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुबमन गिल यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जात आहे.

बीसीसीआयने हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं आहे की, “स्वातंत्र्य दिनानिमित्त पहिल्या भारत श्रीलंका कसोटी सामन्यापूर्वी तिरंगा फडकवण्यासाठी टीम इंडिया गॉल येथे एकत्र आली होती.” व्हिडिओमध्ये सर्व खेळाडू एकसुरात राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत. भारताचा हा 600वा कसोटी सामना असून अशी कामगिरी करणारा आशिया खंडातील पहिला देश आहे. तर इंग्लंड ऑस्ट्रेलियानंतरचा तिसरा संघ असणार आहे.

On the occasion of Independence Day, #TeamIndia gathered at Galle to hoist the Tricolour 🇮🇳 ahead of the First #SLvIND Test.#IndependenceDay pic.twitter.com/tHKIggV6AU

— BCCI (@BCCI) August 15, 2026

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी भारताला दोन्ही कसोटी सामने जिंकणं भाग आहे. कारण आता उर्वरित 9 कसोटी सामन्यात 7 सामने जिंकायचे आहेत. त्यात न्यूझीलंडचा दौरा भारतासाठी कठीण असणार आहे. दुसरीकडे, पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारतात येणार आहे. त्यामुळे दोन्ही दौऱ्यात विजयाचं गणित साध्य करणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे ही कसोटी मालिका 2-0 ने जिंकली तर अंतिम फेरीच्या आशा जिवंत राहतील.

दरम्यान भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला असून कर्णधार शुबमन गिलने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. गॉलचं मैदान प्रथम फलंदाजीसाठी चांगलं आहे.कारण तिसऱ्या दिवसापासून ही खेळपट्टी फिरकीला मदत करते. त्यामुळे भारतीय फलंदाजांसमोर मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान असणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sachin Ahir : ‘हिम्मत कशी होते? यापुढच्या काळात..’ माझगावमध्ये गणेश मिरवणुकीवर अंड फेकण्याच्या घटनेवर सचिन अहिर यांचं रोखठोक भाष्य
  • तीन दिवसानंतर काय होणार? नवं संकट डोक्यावर? हवामान खात्याचा अंदाज काय?
  • Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
  • लाखो चाहत्यांची क्रश, हानिया आमिरच्या त्या व्हिडीओमुळे एकच खळबळ, चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न
  • Abhijit Dipke : अभिजीत दिपकेंचा आणखी एक मोठा विजय, अखेर सरकार झुकलं, घेतला तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in