• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

श्रावण महिन्यात पडणारी ही 4 स्वप्ने असतात अत्यंत शूभ, शंकराच्या कृपेचे मानली जातात लक्षणं

July 28, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मियांचा अतिशय पवित्र महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. श्रावण महिना हा पंचांगानानुसार पाचवा महिना आहे. हिंदू धर्मात या महिन्याचं फार मोठं महत्त्व आहे. श्रावण महिना शिवपूजेसाठी अत्यंत विशेष मानला जातो. या महिन्यात भक्त भगवान शिवाच्या उपासनेसह आध्यात्मिक कार्यात मग्न होतात. असं मानलं जातं की, जर भगवान शिव आपल्या भक्तांवर प्रसन्न असतील, तर ते श्रावण महिन्यात स्वप्नातून संकेत देऊ शकतात. श्रावण महिन्यात तुम्हाला देखील अशी स्वप्न पडत असतील तर, ती साक्षात शंकराच्या कृपेचे लक्षणं मानली जातात..

स्वप्नात शिवलिंग पाहणे: जर तुम्हाला श्रावण महिन्यात वारंवार स्वप्नात शिवलिंग दिसलं, तर समजून घ्या की भगवान शिव तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहेत. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की भगवान शिव लवकरच तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतात. शिवाय, अशा स्वप्नानंतर तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात.

स्वप्नात वाहणारे पाणी किंवा गंगा नदी पाहणे: स्वप्नात गंगा नदी किंवा वाहणारे पाणी पाहणे हे एक अत्यंत शुभ चिन्ह मानलं जातं. जर तुम्हाला श्रावण महिन्यात वारंवार अशी स्वप्ने पडत असतील, तर हे समजून घ्या की भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करता येते. स्वप्नात पाणी पाहणं हे मानसिक संतुलन आणि धनवृद्धीचे प्रतीक देखील मानलं जातं.

स्वप्नात नंदी पाहणे: भगवान शिवाचं वाहन असलेल्या नंदीला स्वप्नात पाहणं हे एक अत्यंत शुभ चिन्ह मानलं जातं. हे स्वप्न सूचित करतं की तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि आर्थिक बाबींमधील अडचणींवर मात केली जाऊ शकते आणि तुम्हाला मोठी जबाबदारी किंवा उच्च पद मिळण्याची संधी देखील मिळू शकते.

स्वप्नात डमरू पाहणे: जर तुम्हाला श्रावण महिन्यात तुमच्या स्वप्नात वारंवार डमरू दिसत असेल, तर समजून घ्या की तुमची स्वप्ने लवकरच पूर्ण होणार आहेत आणि तुम्हाला जीवनात लवकरच आनंद मिळेल. हे स्वप्न सकारात्मक ऊर्जा देणारे देखील मानले जाते. डमरू पाहणे हे भगवान शिवाच्या आशीर्वादाचे प्रतीक देखील आहे आणि या स्वप्नानंतर तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही…)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 99 टक्के लोकांना माहिती नाही बेडवरची गादी किती वर्षांनी बदलावी?
  • पुढचे 17 तास धोक्याचे… 23 राज्यांवर मोठं संकट, 80च्या स्पीडने… IMD ची मोठी अपडेट काय?
  • फोटो, इमेज आणि पिक्चर याचा अर्थ एकच होतो का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? जाणून घ्या तिन्हींमधला फरक
  • IND vs SL: सोनलने टीम इंडियाला झुंजवलं! तिसऱ्या दिवशी काय झालं? फॉलोऑनचं गणित सुटणार का?
  • ‘दीदी जिथे, आम्ही तिथे’ बंडखोरांकडे पाठ, हा आमदार ममता बॅनर्जींच्या खेम्यात, सुप्रीम नोटीस, पारडे पलटणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in