
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणारी एक प्रसिद्ध योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6000 रुपये दिले जातात. प्रत्येक चार महिन्याला एकदा या प्रकारे एकूण 3 टप्प्यांमध्ये हे 6000 रुपये दिले जातात.
सध्या कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असला तरीही अजूनही लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. तांत्रिक कराण, केवायसी अपडेट नसणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणे या कारणांमुले या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाहीये.
दरम्यान, आता केंद्र सरकारने अशा शेतकऱ्यांना आणखी एक संधी दिली आहे. येत्या 30 तारखेपर्यंत या योजनेत नावनोंदणी केलेल्या परंतु आर्थिक लाभ मिळत नसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करता येणार आहेत. 30 एप्रिलच्या अगोदर शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील तांत्रिक त्रुटी दूर करता येईल.
एका सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार 30 एप्रिलनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करता येणार नाहीत. या योजनेच्या अधिकृत संकेतस्थलावर अपडेटेड कागदपत्रांना अपलोड करता येणार नाही. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद झालेले आहेत, त्या शेतकऱ्यांचे नाव या योजनेच्या यादीतून हटवले जाईल.
दरम्यान, हीच बाब लक्षात घेता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्जातील त्रुटी दूर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकसेवा केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी ही त्रुटी दूर करावी.




Leave a Reply