• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शुबमन गिलच्या सांगण्यावरून ऋषभ पंतचं उपकर्णधारपद गेलं? बहिणीने व्हिडीओ लाईक केल्याने चर्चा

May 20, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेत सर्व फासे लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतच्या विरोधात पडले आहे. मोठी धावसंख्या करूनही लखनौ सुपर जायंट्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही तसंच घडलं. 220 धावाही संघाला रोखता आल्या नाहीत. त्यामुळे ऋषभ पंतचा सामन्यानंतर संताप दिसला. दुसरीकडे, ऋषभ पंतचे तारेही फिरल्याचं दिसत आहे. लखनौ संघाची आणि पंतचा फॉर्म चिंताजनक असताना आणखी एक धक्का बसला. अफगाणिस्तान विरूद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. त्यात ऋषभ पंतच्या चाहत्यांना धक्का बसला. एकतर त्याला वनडे संघातून डावलण्यात आलं. दुसरीकडे, वर्षभरापूर्वी त्याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्या पदावरून त्याला काढण्यात आलं. त्याच्या जागी केएल राहुलला उपकर्णधारपद सोपवलं आहे.

असं असताना ऋषभ पंतचं उपकर्णधारपद शुबमन गिलच्या सांगण्यावरून गेल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. इंस्टाग्रामवरील एका व्हिडीओत हा दावा केला गेला आहे. तसं पाहिलं तर सोशल मीडियावर काहीही केलं जातं. कधी कधी त्या दाव्यांना काही अर्थही नसतो. त्यामुळे सोशल मीडियाची विश्वासार्हता कमी झाली आहे. पण ऋषभ पंतवर तयार केलेला व्हिडीओची चर्चा वेगळ्याच कारणाने होत आहे. कारण या व्हिडीओला त्याची बहीण साक्षीने लाईक केलं आहे. दुसरीकडे, पंतला उपकर्णधारपदावरून का काढलं याचं उत्तर मिळालेलं नाही, असा या व्हिडीओचा संदर्भ आहे. दुसरीकडे, ऋषभ पंतच्या नेतृत्वात भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावली होती.

🚨 Rishabh Pant’s sister has liked an Instagram reel that says Shubman Gill has played politics with Rishabh Pant and removed him from the Vice Captaincy so that he don’t have any competition in Test captaincy. 🚨

Someone should tell her, that India lost 2-0 vs South Africa at… pic.twitter.com/DpNs4ACLKu

— Ahmed Says (@AhmedGT_) May 20, 2026

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी दक्षिण अफ्रिकेविरूद्धची कसोटी मालिका खूप महत्त्वाची होती. पण कसोटी मालिकेत ऋषभ पंतने सुमार कामगिरी केली. त्याने दोन कसोटी सामन्यात 49 धावा केल्या होत्या. त्याने 12.2 च्या सरासरीने धावा केल्या. दुसरीकडे, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्याने 4 कसोटीत 479 धावा केल्या होत्या. यात दोन शतकं आणि तीन अर्धशतकं ठोकलं. ऋषभ पंतचं कसोटी क्रिकेट जबरदस्त राहिली आहे. त्याने 49 सामन्यात 42.9 च्या सरासरीने 3476 धावा केल्या आहेत. यात 8 शतकं आणि 18 अर्धशतकं आहेत.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • त्यांना ताकदवान लोक नको, गुलाम लोकं पाहिजेत, बंडखोर संजय दिना पाटील यांचा पलटवार
  • आता राज्यात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट सर्वात मोठा पक्ष, जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती खासदार?
  • Bigg Boss : बिग बॉसमध्ये सिगरेट, दारू, बाथरुममध्ये सेक्स अन्…, पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीकडून शोची पोलखोल
  • India-Pakistan : UN मध्ये भारताला घेरायला गेलेला पाकिस्तान तोंडावर आपटला, भारताचा एकच प्रश्न मुनीर-शरीफची बोलती बंद
  • WIW vs SLW : मी अपयशी कर्णधार, चमारी अट्टापट्टूला विंडीज विरुद्धचा पराभव जिव्हारी, काय म्हणाली?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in