• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरून येते का? BJPचा बड्या नेत्याचे विधान चांगलेच चर्चेत

August 10, 2026 by admin Leave a Comment


भारतात इथेनॉल हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पुढील वर्षापासून देशातील गाड्या ई-20 पेट्रोलवर धावणार आहेत. देशाची अर्थव्यवस्था आत्मनिर्भर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मालमाल करण्यासाठी या इंधनावर जोर देण्यात येणार आहे.हा नवीन इंधनाचा प्रकार आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला. तर नाही, हे कोणतेही नवीन इंधन नाही. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्यात येणार आहे. त्यामुळे परदेशात इंधनावर खर्च होणारा भारतीय रुपया वाचणार तर आहेच. पण देशात इथेनॉल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मात्र, अनेकांनी यावर टीका केली. आता भाजपच्या एका बड्या नेत्याने याविषयी बोलताना थेट ‘शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून येते का?’ असे म्हटले.

कोण आहे तो नेता?

मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. रीवा विमानतळावर कोलकाता-रीवा-भोपाळ हवाई सेवेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित भव्य कार्यक्रमात त्यांनी इथेनॉल मिश्रण आणि शुद्ध पेट्रोलची मागणी करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्यांचा या कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

रीवा विमानतळावर आयोजित कार्यक्रमात कोलकाताहून ७२ सीट असलेले विमान रीवाला पोहोचले आणि तेथून भोपाळसाठी रवाना झाले. यावेळी खासदार जनार्दन मिश्रा यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि पायाभूत सुविधा विकासाची प्रशंसा केली. आपल्या भाषणात जनार्दन मिश्रा यांनी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या सरकारी धोरणाचे जोरदार समर्थन केले. त्यांनी सांगितले की ब्राझीलसारख्या देशात मोठ्या प्रमाणात इथेनॉलचा वापर होत आहे आणि भारतीय वाहनेही पूर्णपणे इथेनॉलवर चालण्यास सक्षम आहेत.

जनार्दन मिश्रा म्हणाले की, भारत आपल्या कच्च्या तेलाच्या केवळ २० टक्के उत्पादन करतो, तर ८० टक्के तेल परदेशातून आयात केले जाते. जागतिक परिस्थितीचा हवाला देत, या भाजप खासदाराने सांगितले की, तेल पोहोचवण्यासाठी जहाजांना अंदाजे १८,००० किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागतो.

व्यासपीठावरून दिली तीव्र प्रतिक्रिया

इथेनॉल मिश्रणाच्या विरोधात आणि शुद्ध पेट्रोलच्या मागणीवर बोलताना खासदार जनार्दन मिश्रा यांची जीभ घसरली. त्यांनी व्यासपीठावरून म्हटले की, “शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून येते का?” ज्या वेळी खासदार जनार्दन मिश्रा हे भाषण करत होते तेव्हा तेथील व्यासपीठावर मध्य प्रदेशाचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला, राज्यमंत्री प्रतिभा बागडी, सतना खासदार गणेश सिंह यांच्यासह अनेक आमदार आणि वरिष्ठ जनप्रतिनिधी उपस्थित होते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • FD पेक्षा जास्त परतावा, RBI ची ही योजना मालामाल करणार, हमीसह भविष्य सुरक्षित होणार
  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in