• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिवसेना कोणाची? PM मोदी आणि फुटीर खासदारांच्या भेटीवरून संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

August 8, 2026 by admin Leave a Comment


सुप्रीम कोर्टात शिवनेना पक्ष-चिन्ह वादावरून सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टात ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्हावर सुनावणी सुरू असताना काल पंतप्रधान मोदी आणि फुटीर खासदारांची भेट झाली. ब्रेकफास्टसाठी बोलावलेल्या भेटीवरुन खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान मोदी कोर्टावर दबाव आणत आहे, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सुप्रीम कोर्टातील सुनावणीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी फुटीर खासदारांना बोलावून आश्वासन देतात. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. देशाच्या पंतप्रधानांचं पक्षपाती वर्तन आहे. आम्हाला का बोलावत नाही? मी 25 वर्ष खासदार आहेत. आमच्या इतर खासदारांना का बोलावत नाही? राहुल गांधी यांना का बोलावत नाही? विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांमध्ये चहापान होतं. एकमेकांसोबत चर्चा होते. काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, डाव्या पक्षाच्या खासदारांना का बोलावत नाही?’

‘पंतप्रधान मोदी आमच्या फुटीर सहा खासदारांच्या तोंडात जिलेबी भरत होते. ढोकळा, जिलेबी भरवत होते. एकाच्या घशात ढोकळा अडकला. त्यानंतर मोदींनी त्याच्या छातीवरून हात फिरवला, असं लोक सांगत आहे. मला माहीत नाही. ते त्यांना पाठिशी असल्याचं सांगत आहे. खरंतर गद्दारीचं प्रकरण न्यायालयात सुरू आहे. तुम्ही सांगताय की, मी पाठिशी आहे. म्हणजे तुमचा न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का? सध्या सुनावणी सुरू आहे. नरेंद्र मोदी गद्दारांना फाफडा-ढोकळा खायला बोलवतात, असे संजय राऊत म्हणाले.

‘गेल्या पंधरा दिवसांत पंतप्रधान संसदेत येऊ शकले नाही. तिकडे आल्यावर आम्ही तुम्हाला देतो. तुम्हाला खिचडी, फाफडा, जिलेबी आवडत असल्यास देऊ. संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून आलेले नाहीत. मोदी कायद्याचे आणि संविधानाचे रक्षक असते तर एक पथ्य पाळायला पाहिजे होते. तृणमूल काँग्रेस आणि 6 फुटीर खासदारांचं प्रकरण कोर्टात आहे. तरी तुम्ही त्यांना भेटत आहात. याचा अर्थ पक्षांतराला समर्थन देत आहात. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षात जातात. त्यांना नरेंद्र मोदी हे त्यांच्या तोंडात जिलेबी भरवतात. हा संविधानाचा सर्वात मोठा अपमान आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याकडून फुटीर खासदारांना भेटण्याचा गुन्हा. या खासदारांविरोधात खटला सुरू आहे. तुम्ही न्यायालयावर दबाव आणत आहात, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भीक मागत मागत मृत्यू… घराची झडती घेताच सापडल्या 30 पोती नोटा अन् नाणी, एकूण खजिना… सर्वांनाच बसला धक्का
  • स्पर्धेच्या युगात मुलांच्या उज्वल भविष्य घडवण्यासाठी आई – वडिलांनी ही मूल्य जपलीच पाहिजे
  • युट्युब गेमचा २४ तासांचा खतरनाक चॅलेंज, घरातून दोन लहान मुले गुपचुप पळाली, नंतर काय झाले ?
  • Kriti Sanon: रक्षाबंधनच्या जाहिरातीवरून झालेल्या वादावर अखेर क्रिती सनॉनने सोडलं मौन; महिलांनी कसे कपडे घालावेत हे..
  • Abhijeet Dipke: पैसे कमी मिळायचे म्हणून अभिजीत दिपके याने सोडली होती आम आदमी पार्टी, मोठा खुलासा, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in