• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शाहिद कपूरला पुण्यात धक्काबुक्की, कृती सॅनन आणि रश्मिका मंदाना यांच्याही दिशेने लोकांची झुंबड, थेट..

June 15, 2026 by admin Leave a Comment


पुणे म्हटले की, शिस्त आणि पुणेरी पाट्या सर्वांच्या डोळ्यापुढे येतात. पुण्यातील शिस्त कायमच चर्चेत असते. मात्र, पुण्यात एक असा धक्कादायक प्रकार घडला, ज्याने एकच मोठी खळबळ उडाली. थेट बॉलिवूड कलाकारांना पुण्याबद्दल वाईट अनुभव आला. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि कृती सॅनन यांना मोठा फटका बसला. हे तीनही कलाकार पुण्यातील विमाननगर परिसरात असलेल्या फिनिक्स मॉलमध्ये कार्यक्रमासाठी पोहोचले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी कोणत्याही पद्धतीचे पास किंवा तिकिट ठेवले नव्हते. सर्वांकरिता हा कार्यक्रम खुला होता. मँडाँक फिल्म्सच्या वतीने कार्यक्रम ठेवण्यात आला. मात्र, कोणत्याही प्रकारचे पास नसल्याने आपल्या आवडत्या स्टारला बघण्याकरिता लोकांनी तुडूंब गर्दी केली. कलाकार मंचावर पोहोचताच लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला. थेट काहींनी हुल्लडबाजी करण्यास सुरूवात केली.

आपल्या आवडत्या कलाकाराला बघण्याकरिता मंचाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरक्षेसाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स बाजूला सारून अनेकजण पुढे गेले. थेट कलाकारांच्या अंगावर धावून काहीजण गेले. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेचे तीन तेरा वाजले. बाऊन्सर्स आणि सुरक्षा रक्षक काहीच करू शकत नव्हते, कारण गर्दीचे तितकी जास्त होती. थेट कलाकारांनीही धक्काबुक्की झाली.

कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन ढासळले. परिस्थिती लक्षात घेताच कलाकारांनी पळ काढला. तरीही लोक त्यांच्या मागे धावत होती. यादरम्यान पुढील अनर्थ टाळण्यासाठी कार्यक्रमाच्या आयोजकांनी तात्काळ कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. काही लोकांना यादरम्यान दुखापत झाल्याचीही माहिती पुढे येत आहे. शाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि कृती सॅनन या कलाकारांना बेक्कार अनुभव आला.

महिला, लहान मुले, तरूण-तरूणी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पोहोचले होते. मात्र, गर्दी जास्त आणि सुरक्षा कमी अशी स्थिती निर्माण झाली. कलाकारांच्या अत्यंत जवळ येण्याचा प्रयत्न लोक करत होते. झुंबडीने कलाकारांच्या अंगावर धावत होते. ढिसाळ नियोजन या कार्यक्रमाचे या माध्यमातून बघायला मिळाले. शेवटी कलाकारांनी गर्दीतून मार्ग काढत बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले…
  • गाडीचा स्पीड अन् रोड ग्रिप होणार आणखी भारी; जाणून घ्या कारचे टायर्स अपग्रेड करण्याची योग्य पद्धत
  • नवीन गाड्यांमधील ‘हे’ 4 सीक्रेट फीचर्स प्रवासाला बनवतील सुरक्षित अन् सोपे; तुम्हाला माहीत आहेत का?
  • मारुती सुझुकीचा ग्राहकांना मोठा झटका! लाँचिंगनंतर पहिल्यांदाच वाढवली e-Vitara ची किंमत; पाहा किती झाली महाग
  • नवे घर खरेदी करताय? मग बजेटमध्ये ‘या’ अतिरिक्त शुल्कांचा नक्की समावेश करा, नाहीतर होईल आर्थिक कोंडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in