• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शाखा संचलनापासून ते पर्यावरण, संघांच्या प्रांत प्रचारक बैठकीत महत्वाची चर्चा

July 12, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक आज कर्नाटकातील बेळगाव येथे झाली. या बैठकीत मार्च २०२६ पासून संघाच्या विविध स्तरांवर आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गांचा आढावा घेण्यात आला. यावर्षी देशभरात एकूण ८३ संघ शिक्षा वर्ग आणि १२ कार्यकर्ता विकास वर्ग आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये एकूण १८,८४२ स्वयंसेवकांना सहभाग घेतला होता. या स्वयंसेवकांना शाखा संचलन, संघ कार्यपद्धती, ग्राम विकास, कुटुंब प्रबोधन, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण यांसारख्या विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत सद्यस्थितीशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली, प्रामुख्याने जनगणनेतून मिळालेली माहिती आणि लोकसंख्येच्या असंतुलनामुळे निर्माण झालेली आव्हाने आदी विषयांवर खल झाला. अंमलीपदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांविषयीची चिंता, अंमलीपदार्थांच्या व्यसनमुक्तीसाठी प्राधान्याने करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची गरज आणि संत शिरोमणी रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांचे नियोजन यावरही येथे चर्चा झाली.

रक्कम अपहार प्रकरणावर दु:ख

या बैठकीत सर्वांनी श्री रामजन्मभूमी मंदिरातील दानपेटीतील रक्कम अपहार प्रकरणावर दु:ख व्यक्त केले. तसेच तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या निवेदनानुसार सुरु असलेली एसआयटी चौकशी आणि पोलिसांची कारवाई योग्यप्रकारे पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला. तीर्थक्षेत्राच्या ट्रस्टींनी अपेक्षा व्यक्त केली की भविष्यात अशी कोणतीही घटना होऊन नये ज्यामुळे संपूर्ण रामभक्तांच्या राममंदिराच्या बद्दलची श्रद्धा आणि आस्थेला आघात होईल.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in