• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शरद पवार खरोखरच एनडीएसोबत जाणार? माजी मंत्र्याने थेटच सांगितलं; म्हणाले, आम्ही चौघे…

July 28, 2026 by admin Leave a Comment


गेल्या आठवड्यात CJP आंदोलनादरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार हे दिल्लीत पोहचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतली. त्यावरून पुन्हा राष्ट्रवादी एनडीएसोबत जाण्याची चर्चा रंगली. त्याअगोदर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली. तर सुनील तटकरे यांच्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनवणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. या भेटसत्राने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार हे NDA च्या वाटेवर असल्याचा दावा करण्यात येत आहे. या सर्व घाडमोडींवर माजी मंत्र्यांने मोठी माहिती दिली आहे.

शरद पवार खरंच एनडीएसोबत जाणार?

माजी मंत्री महादेव जानकर यांनी या तर्कवितर्कावर मोठे भाष्य केले आहे. शरद पवार हे एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवर त्यांनी कोल्हापूरमध्ये मोठे वक्तव्य केले. उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस, राष्ट्रवादी आम्ही एकत्र आहोत. त्यातून एखादं बाजूला गेलं तर जनता त्यांना बाजूला करेल. शरद पवार एनडीए सोबत जाणार नाहीत असं वाटतं, असे जानकर म्हणाले. ते समाजवादी विचाराचे आहेत त्यांनी तिकडे जाऊ नये. मात्र गेले तर ते वाईट असेल. लोक आता लीडर नाही तर केडर बेसचं राजकारण पाहतात. आम्ही सगळे विरोधी पक्ष आता राहुल गांधींसोबत आहोत, असे जानकर सांगितले.

कुणाच्या जाण्याने फरक पडणार नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या आठवड्यात दिल्लीत पोहचले होते. त्यावर जानकर यांनी प्रतिक्रिया दिली. आता सखाराम गेला आणि तुकाराम गेला यांनी काही फरक पडणार नाही. युवकांना सांगणं आहे शिक्षण व्यवस्था बदला. फडणवीस गेले गडकरी गेले तरी काही फरक पडणार. भाजप पक्षाची सत्ताच घालवा हे युवकांना आवाहन आहे. आम्हाला 2019 ला केंद्र आणि राज्यामध्ये बदल करायचा आहे, असे जानकर यांनी टोला हाणला.

भाजपवर मोठी टीका

जिथे पडती बाजू असते तिथे आम्ही असतो. त्यावेळी काँग्रेसला वाटत होतं आमच्याशिवाय काहीच नाही. त्यांना अद्दल घडवण्यासाठी आम्ही भाजप सोबत गेलो. मात्र नंतर आम्हाला काँग्रेसच बरं म्हणायची वेळ आली, असे वक्तव्य जानकर यांनी केले. आमच्यासारख्या छोट्या पक्षांचे आमदारच फोडायला त्यांनी सुरुवात केली. भाजपला आम्ही सहारा द्यायला गेलो तर त्यांनी आमचे पाय तोडायला सुरुवात केली. आम्ही आता हलणार नाही असा दावा भाजप करत आहे. पण आम्ही जिकडे असतो त्याचा विजय होतो. इथून पुढे देशात भाजपची सत्ता नसेल, असा दावा जानकर यांनी केला.

मोदी, शहा, अदानी आणि अंबानी हे आमचे चार पिलर आहेत अशा अविर्भावात भाजप आहे. तुमच्याकडे राज्यात आणि केंद्रात सत्ता असेल तर आमदार खासदार का पडताय. तुम्ही तुमचे लीडर बनवा. भाजपला देशात विरोधी पक्ष ठेवायचा नाही. त्यांना विरोधी पक्षांना नामशेष करायचं आहे, असा आरोप जानकर यांनी केला.

नीट परीक्षा पद्धतच रद्द करा

देशामध्ये नीट परीक्षेची पद्धतच रद्द करा अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. दीड महिन्यापूर्वी मोदी सरकारने साडेतीनशे सेक्रेटरी बॅक डोअरने भरून घेतले. हे आर.एस.एसचे षडयंत्र आहे. बहुजनांना तरुणांना उल्लू बनवून देशात आराग जगता मागवायचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. जंतर-मंतर मधील जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत तीच मोदी सरकारच्या पतनाची सुरुवात आहे, असे जानकर म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chandra Grahan 2026 : वर्षातलं शेवटचं चंद्र ग्रहण कधी ? ग्रहणाच्या दिवशी ही काम टाळाच,नाहीतर..
  • लिंगबदल करणाऱ्या अनाया बांगरकडून आनंदाची बातमी, अखेर ते स्वप्न पूर्ण होणार; बऱ्याच दिवसांपासून…
  • मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
  • कलाकार असावा तर असा, एका भूमिकेसाठी या अभिनेत्याने 50 दिवस केली नाही अंघोळ, वास येऊ नये म्हणून मारायचा परफ्यूम
  • रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृत्यू की घातपात? सर्वात धक्कादायक सत्य समोर; आईमुळे…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in