
Shatrughan Sinha On Reena Roy: बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा अभिनेते शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होते. अभिनेत्री रीना रॉय यांच्यासोबत शत्रुघ्न सिन्हा अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण एक काळ असा देखील आला जेव्हा रीना यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले ‘तिला जिथे जेवढं स्पर्श करायचं होतं तेवढं केलंय, आता पुढे तिला स्पर्श करण्याची जराही इच्छा नाही…’, एवढंच नाही तर, रीना यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत लग्न करायचं होतं. पण त्यांनी जोडीदार म्हणून पूनम यांची निवड केली. त्यानंतर रीना यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खान यांच्यासोबत लग्न केलं.
मोहसीन खान यांच्यासोबत लग्न केल्यानंतर रीना यांनी फक्त बॉलिवूडला रामराम ठोकला नाही तर, देश देखील सोडला आणि पाकिस्तानात गेल्या. त्यानंतर रीना यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर रीना आणि मोहसीन यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेताला. घटस्फोटानंतर मुलीची कस्टडी रीना यांना मिळाली आणि त्या पुन्हा भारतात आल्या..
रीना रॉय यांच्याबद्दल काय म्हणालेले, मोहसीन खान?
एका मुलाखतीत मोहसीन म्हणालेले, ‘लग्नाआधी मी रीनाचा एकही सिनेमा पाहिलेला नव्हाता. मी तिच्यासोबत तिच्या सौंदर्यामुळे किंवा लोकप्रियतेमुळे लग्न कधीच केलं नव्हतं. तिचा स्वभाव आणि तिचं चांगले वागणं पाहून मी तिच्यासोबत लग्न केलं. मी जे बोलत आहे, त्यावर कदाचित कोणी विश्वास ठेवणार नाही. पण हेच सत्य आहे.’ असं देखील मोहसीन म्हणालेले.
रीना रॉय – मोहसीन खान लग्न
शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीची ओळख पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू मोहसिन खान यांच्यासोबत झाली आणि दोघांनी लग्न केलं. पण लग्नानंतर देखील रीना रॉय यांना प्रेम मिळालं नाही. अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेकदा प्रेमाची एन्ट्री झाली, पण खरं प्रेम तिला कधी मिळालं नाही. लग्नानंतर रीना यांनी एका मुलीला जन्म दिला. पण मुलीच्या जन्मानंतर दोघांमध्ये वाद होवू लागले. अखेर रीना आणि मोहसिन खान यांचा घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्यानंतर रीना मुलीला घेवून पुन्हा मुंबईमध्ये आल्या.
Leave a Reply