• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

व्हायरल ऑडिओ, सूनेबद्दल आक्षेपार्ह शब्द, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

July 30, 2026 by admin Leave a Comment


नंदूरबारच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिपने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये भाजप नेते विजय चौधरी यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे समोर आलं आहे. यावरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपवर आमदार एकनाथ खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मी ऑडिओ क्लिप ऐकली आहे. नवीन भाजप आणि जुनी भाजपमध्ये संस्कृतीचा फरक आहे. चौधरीसारख्या लोकांमुळे भाजपची प्रतिमा खराब होते. विजय चौधरी हे गेल्या 25-30 वर्षांत दारुच्या धंद्यात आहे. नंदूरबार जिल्ह्यातील दारूमाफीया म्हणून यांचं कुटुंब ओळखलं जातं. पैसे खर्च करावे, यासाठी त्यांना भाजपचे सरचिटणीस केलं. अशा स्वरुपाचं वर्तवणूक, विचार करण्याची प्रवृत्ती आहे. एकाच घरात दोन पक्ष आहे. नारायण राणे यांचं उदाहरण देता येईल. ते काँग्रेसमध्ये होते. त्यांचा एक मुलगा भाजपमध्ये आहे. तर एक शिवसेनेत आहे.

‘भाजप स्वतंत्र पक्ष आहे. राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष आहे. चौधरी यांनी असभ्य आणि अश्लाघ्य शब्द महिलांविषयी वापरले आहेत. ही भाजपची संस्कृती आहे का? महिलांबाबत घाणेरडे शब्द वापरले आहेत. माझ्या तोंडून शब्द येणार नाही, असे शब्द वापरले आहेत. रक्षा खडसे, कल्पना पांडे यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत. महिलांच्या बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे, हे दिसून येते. त्यांनी राजीनामा दिला, हे बरे केले. असे अनेक लोक भाजपमध्ये आहेत. वर्षानुवर्षे काम केलेला माणूस आहे. पक्षाचा सरचिटणीस आहे. अनेक पदांवर काम केलं आहे. नवी माणसं न आवरणारी आहे. यामुळे भाजपची प्रतिमा वाईट होत आहे. भाजपने त्यांची चिंता करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

आताच्या भाजपवर टीका करताना खडसे म्हणाले की, ‘आताची भाजप आणि आधीची भाजपमध्ये फरक आहे. आताचे मंत्री ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. एखाद्या मंत्र्‍याने ताबडतोब थांबवलं असतं. या मंत्र्याने थांबवलं नाही, शांतपणे ऐकून घेतलं. महिलांविषयी घाणेरडे शब्द वापरले, त्यांना रोखायला हवं होतं’. रक्षा खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली, त्यावर बोलताना खडसे म्हणाले, ‘फक्त सूनेविषयी घाणेरडे शब्द वापरले नाहीत. तर नंदुरबारमधील स्थानिक महिलांसोबतही असभ्य वर्तन केलं आहे. मी ही क्लिप भाजपच्या वरिष्ठांकडे देणार आहे. माझेही भाजपच्या वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत. त्यांना ही बाब कळवणार आहे. अशी घटना घडत असेल, तर हे दुर्दैव आहे’.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in