• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वैभव सूर्यवंशी VS रिचर्ड एनगरावा! एकाच षटकात फूल ड्रामा, चौकार षटकार आणि विकेट Watch Video

July 25, 2026 by admin Leave a Comment

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली. वैभव सूर्यवंशीने पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. त्याने 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यात त्याच्याकडून तशाच कामगिरीची अपेक्षा होती. वैभव सूर्यवंशीने त्या दृष्टीने आक्रमक सुरूवात करून दिली. पण मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्याने 9 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार मारत 20 धावा केल्या आणि बाद झाला. पण या छोट्या खेळीत वैभव सूर्यवंशी आणि झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज रिचर्ड एनगरावा यांच्यात द्वंद्व पाहायला मिळालं. या दोघांच्या रंगलेल्या द्वंद्वामुळे सामन्यात एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. भारतीय डावाच्या तिसऱ्या षटकात हे चित्र पाहायला मिळालं.

या षटकात नेमकं काय घडलं?

झिम्बाब्वेकडून तिसरं षटक टाकण्यासाठी रिचर्ड एनगरावा आला होता. तसेच स्ट्राईकला वैभव सूर्यवंशी होता. या षटकाचा पहिला चेंडू निर्धाव गेला. त्यावर वैभव सूर्यवंशीने जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला काही यश आलं नाही. त्यानंतर वैभव सूर्यवंशीने दुसर्‍या चेंडूवर चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर षटकार मारत आपला हेतू काय आहे हे स्पष्ट केलं. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारला. या चार चेंडूत वैभवने एनगरावाला बॅकफूटवर ढकललं होतं. या चार चेंडूत वैभवने 18 धावा काढल्या. एनगरावा असा पद्धतीने धुतल्यानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाही हैराण झाला आणि शेवटच्या चेंडूसाठी त्याने फिल्डिंगमध्ये बदल केला.

S🥵🥵RYAVANSHI

4⃣6⃣4⃣4⃣

Watch it LIVE on FanCode! 🇮🇳 👇https://t.co/3kCBPJuPrW#ZIMvIND #IndiaCricket #RokoNahiThoko pic.twitter.com/9EHYBT9fjw

— FanCode (@FanCode) July 25, 2026

ZIMBABWE NE HI THOK DIYA 🥲

Watch it LIVE on FanCode! 🇮🇳 👇https://t.co/3kCBPJuPrW#ZIMvIND #IndiaCricket #RokoNahiThoko pic.twitter.com/ZWBoewGHfp

— FanCode (@FanCode) July 25, 2026

वैभव सूर्यवंशीसाठी लाँग ऑनवर एक क्षेत्ररक्षक ठेवला. त्याचा परिणाम शेवटच्या चेंडूवर दिसून आला. हा चेंडू टाकताना एनगरावाने थोडा बदल केला आणि शॉर्ट टाकला. यावर प्रहार करताना वैभव चुकला. लेग स्टंपच्या दिशेने जात पुल मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू काही बॅटवर व्यवस्थित आला नाही. त्यामुळे लाँग ऑनला असलेल्या ब्लेसिंग मुजरबानीच्या हातात झेल गेला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in