• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये आक्रमक फलंदाजी करू शकत नाही? सॅम करनचं मोठं विधान

July 4, 2026 by admin Leave a Comment


भारतीय संघातील 15 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची चर्चा क्रीडाविश्वात होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला कधी संधी मिळणार? याची उत्सुकता लागून आहे. असं असताना इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनने या खेळाडूबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्याच्या मते, वैभव सूर्यवंशीकडे टॅलेंड आहे, पण इंग्लंडच्या स्थितीत धावा करणं वैभवला आव्हानात्मक असेल. (PC-GETTY IMAGES)

सॅम करनने मॅन्चेस्टर टी20 सामन्यापूर्वी मीडियाशी वार्तालाप केला आणि सांगितलं की, 'इंग्लंडमधील स्थिती वेगळी आहे. या ठिकाणची खेळपट्टी भारताच्या तुलनेत खूप वेगळी आहे. गोलंदाजांना त्याचा प्लान लागू करण्याची चांगली संधी असेल.' (PC-GETTY IMAGES)

सॅम करनने सांगितलं की, सूर्यवंशी चांगला फलंदाज आहे यात काही दुमत नाही. पण जेव्हा त्याचं पदार्पण होईल तेव्हाच खरी परीक्षा असणार आहे. सॅम करन म्हणाला की, 'भारतात क्रिकेटर होणं मोठी गोष्ट आहे. पण सर्वात आव्हानात्मक म्हणजे सूर्यवंशी आपली लोकप्रियता कशी सांभाळणार. खरी परीक्षा पदार्पण केल्यानंतर असणार आहे.' (PC-GETTY IMAGES)

वैभव सूर्यवंशीचं दुसऱ्या टी20 सामन्यात पदार्पण होणं कठीण मानलं जात आहे. मॅन्चेस्टरमध्ये पहिल्या टी20 सामन्यात खेळलेल्या प्लेइंग 11 सह टीम इंडिया मैदानात उतरण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचे वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल यांनी तसे संकेत दिले आहेत. (PC-GETTY IMAGES)

इंग्लंडने दुसऱ्या टी20 सामन्यासाठी 24 तासाआधीच प्लेइंग 11 जाहीर केली आहे. मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी करणाऱ्या साकिब महमूदला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. साकिबने मागच्या सामन्यात तीन विकेट घेतले होते. पण दुसर्‍या सामन्यात त्याच्या जागी जोफ्रा आर्चरला संधी दिली आहे. (PC-GETTY IMAGES)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in