• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वैभव सूर्यवंशीला वयाच्या 15व्या वर्षीच उपकर्णधारपद देण्याचं कारण आलं पुढे, झालं असं की…

July 30, 2026 by admin Leave a Comment


वैभव सूर्यवंशीने वयाच्या 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय ठेवला आणि विक्रमांची नांदी सुरू झाली आहे. प्रत्येक सामन्यात त्याच्या नावावर काही ना काही विक्रम नोंदवला जात आहे. त्यामुळे त्याच्या नावाची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होत आहे. असं असताना देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याच्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. वैभव सूर्यवंशीला दुलीप ट्रॉफीसाठी ईस्ट झोनचा उपकर्णधार केलं आहे. या निर्णयावर क्रिकेट तज्ज्ञांनी आक्षेप नोंदवत प्रतिक्रिया दिल्या आहे. कारण वैभव सूर्यवंशीचं वय फक्त 15 वर्षे आहे. तसेच त्याने आता कुठे व्यावसायिक क्रिकेट खेळायला सुरूवात केली आहे. अशा स्थितीत त्याच्यावर जबाबदारी टाकणं योग्य नसल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. वैभव सूर्यवंशीकडे ईस्ट झोनच्या कर्णधारपदाची जबाबदारी का सोपवली? याचं कारण सिलेक्शन कमिटीने सदस्य प्रवंजन मलिका यांनी सांगितलं आहे.

वैभव सूर्यवंशीकडे उपकर्णधारपद देण्याचं कारण की…

वैभव सूर्यवंशीकडे उपकर्णधारपद सोपल्यानंतर क्रीडावर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर ईस्ट झोन सिलेक्शन कमिटीने सदस्य प्रवंजन मलिक यांनी सांगितलं की, ‘वैभव सूर्यवंशी कर्णधारपद सोपवलेलं नाही, त्याला फक्त उपकर्णधारपद दिलं आहे. कर्णधार इशान किशन आहे. इशान किशन एक विकेटकीपर फलंदाज आहे आणि तो सामन्यात पूर्णपणे उपलब्ध असेल. वैभवकडे जबाबदारी सोपवून त्याला परिपक्व करण्याचा आमचा हेतू आहे.’

वैभव सूर्यवंशी एक दिवस नक्कीच भारताचा कर्णधार होणार

प्रवंजन मलिकने वैभव सूर्यवंशीची स्तुती एक दिवस तो नक्कीच टीम इंडियाचा कर्णधार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रवंजन मलिक म्हणाले की, ‘सूर्यवंशीला दुलीप ट्रॉफीमध्ये उपकर्णधार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. आमचा विश्वास आहे की, तरुण खेळाडूंना जबाबदारी दिली पाहिजे. कुणास ठाऊक, एक दिवस तो भारतीय संघाचा कर्णधार बनेल. त्याला उपकर्णधारपद देण्यामागे हाच आमचा विचार आहे. तो देशासाठी चांगली कामगिरी करत आहे आणि राजस्थान रॉयल्ससाठी त्याचा आयपीएलचा हंगाम चांगला गेला आहे. तो बिहार रणजी संघाचाही उपकर्णधार आहे.’

मोठ्या खेळीची आवश्यकता

वैभव सूर्यवंशी टी20 क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू आहे, यात काही शंका नाही. पण क्रिकेटच्या इतर फॉर्मेटमध्ये वैभवची कामगिरी आखुड होत जाते. वैभव सूर्यवंशी आतापर्यंत 8 फर्स्ट क्लास क्रिकेट सामने खेळला आहे. त्याने फक्त 207 धावा केल्या आहे. त्याची सरासरी फक्त 17.25 ची आहे. यात फक्त एकच अर्धशतक ठोकलं आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला व्हाईट बॉल क्रिकेटप्रमाणेच रेड बॉल क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकाच हायवेवर वेगवेगळ्या ठिकाणी का असते ‘स्पीड लिमिट’? जाणून घ्या यामागचे रंजक गणित
  • टोयोटाची बाजारात मोठी घोषणा; ‘Urban Cruiser Hyryder’ चे शानदार ‘Aero Black Edition’ लाँच
  • ‘विनफास्ट’चा धमाका; कारनंतर आता भारतात आणणार जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर, डिझाईन पेटंट फायनल
  • Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
  • Salman Khan : ‘बंटवारा 1947’ पाहताच भाईजानने केला खास कॉल, काय म्हणाला सलमान खान ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in