• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विश्वास करावा तरी कोणावर… अभिनेत्री रवीना टंडनच्या आईच्या घरी मोठी चोरी, थेट घरातीलच..

June 2, 2026 by admin Leave a Comment


नुकताच एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. अभिनेत्री रवीना टंडन हिच्या आईचे तब्बल 25 लाखाचे दागिने चोरीला गेली. या प्रकरणात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी महिलेला अटकही केली. या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. विश्वास ठेवावा तरी कोणावर असा प्रश्नही आहे. या चोरी प्रकरणात एका विश्वासू महिलेलाच पोलिसांनी अटक केली. अभिनेत्री रवीना टंडन यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करून त्यांच्या आईचे सुमारे 25 लाख रुपये किमतीचे दागिने आणि महागडी घड्याळे चोरल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी 47 वर्षीय रशी छाब्रिया हिला अटक केली आहे. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. सुरूवातीला कुटुंबियांनी विचारणा केली असता या महिलेने चोरी केल्याचा आरोप फेटाळून लावला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिला 2020 पासून टंडन कुटुंबाच्या संपर्कात होती आणि रवीना टंडन यांच्या आईची देखभाल करण्यासाठी घरात सतत ये-जा करत होती. याचाच या महिलेने गैरफायदा घेतला. घरातील तिजोरी फोडून सोन्या-हिऱ्याचे दागिने आणि दोन महागडी घड्याळे चोरी केल्याचा तिच्यावर आरोप आहे. कुटुंबियांना तिजोरी फोडल्याने चोरीचा संशय आला.

त्यानंतर तपासले असता दागिने हरवल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी चौकशी केली असता आरोपीने सुरुवातीला आरोप फेटाळले. मात्र, पोलिस तक्रारीनंतर तिला अटक करण्यात आली. चोरीतील काही घड्याळे जप्त करण्यात आली असून उर्वरित दागिन्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणात अधिकचा तपास केला जात आहे. महिला गेल्या काही वर्षांपासून संपर्कात होती.

ती सतत घरात ये-जा करत होती. त्यामुळे कुटुंबियांना तिच्यावर अजिबातच कधीच संशय आला नाही. मात्र, ज्यावेळी तिजोरी कोणीतरी फोडून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर कुटुंबियांनी महिलेकडे विचारपूस केली. मात्र, तिने चोरी आपण केली नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यानंतर टंडन कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली. जुहू पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मात्र, या घटनेने चांगलीच मोठी खळबळ उडाली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in