• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विवो आणि रियलमीसह ‘या’ कंपन्यांनी हे स्मार्टफोन्स केले 7 हजार रुपयांनी महाग

July 4, 2026 by admin Leave a Comment


स्मार्टफोनच्या किमती हळूहळू वाढत आहेत, दररोज कोणती ना कोणती मोबाईल कंपनी स्मार्टफोनच्या किमती वाढवत आहे. ज्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे. मेमरीची कमतरता जवळपास प्रत्येक कंज्यूमर टेक कंपनीला भेडसावत आहे, मग ते स्मार्टफोन असो, लॅपटॉप असो किंवा इतर कोणतेही कंज्युमर इलेक्ट्रॉनिक उपकरण असो. एआय (AI) कंपन्यांमुळे वाढलेल्या मागण्यामुळे कंपन्यांना मेमरीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. आता विवो (Vivo) आणि रियलमी (Realme) कंपन्यांही काही स्मार्टफोनच्या किमती वाढवल्या आहेत. या फोनच्या किमती 1 हजार रूपयांपासून 7000 रुपयांपर्यंत वाढली आहे, ही किंमत वाढ फोनच्या मॉडेलनुसार ठरत आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की कोणत्या फोनच्या किमती वाढल्या आहेत.

विवो स्मार्टफोनच्या किमतीत वाढ

इंडिया टुडेच्या एका अहवालानुसार कंपनीच्या फ्लॅगशिप एक्स सिरीज, प्रीमियम मिड-रेंज व्ही सिरीज, मिड-रेंज टी सिरीज आणि बजेट वाय सिरीज मॉडेल्सचा यात समावेश आहे. Vivo X300 FE च्या किमतीत सर्वात मोठी वाढ झाली आहे. ज्यामध्ये 12GB/256 GB व्हेरिएंट असलेला फोन 79 हजार 999 रूपयांमध्ये लाँच झालेला होता, मात्र आता हाच फोन 86 हजार 999 रूपयांच्या किमतीमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे. 12GB/512GB व्हेरिएंट आता 89 हजार 999 रूपयांवरून 96 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध झाला आहे.

Vivo V70 FE चा 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट आता 37 हजार 999 रुपयांऐवजी 41 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंट 40 हजार 999 रुपयांऐवजी 45 हजार 999 रुपयांना आणि 12GB रॅम आणि 256GB व्हेरिएंट 44 हजार 999 रुपयांऐवजी 46 हजार 999 रुपयांना विकला जाईल.

नथिंग फोनच्या किमतीत वाढ

‘नथिंग’ने आपल्या फोन 4a सिरीजच्या किमतीत 4 हजार रूपयांपर्यंत वाढ केली आहे. 4a च्या 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत आता 39 हजार 999 रूपयांपासून सुरू होते, जी पूर्वी 37 हजार 999 रूपयांपर्यंत होती. हा फोन 31 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. टिपस्टर संजू चौधरी यांच्या माहितीनुसार, 4a प्रो च्या 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटची किंमत आता 52 हजार 999 रूपयांवरून वाढून 54 हजार 999 रूपये इतकी झाली आहे.

रियलमी स्मार्टफोनच्या किमतीत वाढ

रियलमी 16 प्रो आता 46 हजार 999 रूपयांऐवजी 49 हजार 999 रूपयांच्या वाढत्या किमतीत खरेदी करता येईल. हा फोन 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटसाठी 39 हजार 999 मध्ये लाँच करण्यात आला होता. रियलमी 16 ची किंमत देखील 1 हजार रूपयांनी वाढली आहे. 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट आता 33 हजा 999 रूपयांऐवजी 34 हजार 999 रूपयांमध्ये विकला जाईल. हे डिव्हाइस 31 हजार 999 मध्ये लाँच करण्यात आले होते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..
  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in