• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त… राहुल गांधींनी सांगितल्या तीन कॅटेगिरी; लोकसभेत प्रचंड गोंधळ

July 29, 2026 by admin Leave a Comment


अँटी पेपर लिक दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला. यावेळी राहुल गांधी यांनी भाषण सुरू करताच पहिल्या पाच मिनिटातच सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. राहुल गांधी यांनी लोकसभेत विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त या तीन कॅटेगिरी असल्याचं सांगितलं. त्यावर सभागृहातील सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यावर राहुल गांधी यांनी हा शब्द असंसदीय शब्द नाही, असं सांगत आपलं भाषण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्ताधाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटी हे शब्द कामकाजातून काढून टाकण्यात आले.

राहुल गांधी यांनी सभागृहात एका विद्यार्थ्याच्या चर्चेचा उल्लेख करत तीन कॅटेगिरी सांगितल्या. स्टुडंट, इडियट आणि अंधभक्त या तीन कॅटेगिरी आहेत. अंधभक्त ही तिसरी कॅटेगिरी आहे. ही कॅटेगिरी मूर्खाला फॉलो करतेय, असं राहुल गांधी यांनी असं विधान करताच सभागृहात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. यावेळी किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांनी असंसदीय भाषेचा वापर केल्याचा आरोप केला. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हस्तक्षेप करत राहुल गांधी यांचे शब्द असंसदीय असून ते कामकाजातून काढण्याची मागणी केली. राजनाथ सिंह यांच्या हस्तक्षेपानंतर हा शब्द कामकाजातून काढून टाकण्यात आला. त्यानंतर राहुल गांधी पुन्हा बोलण्यास उभे राहिले. त्यांनी पुन्हा एकदा तीन कॅटेगिरी असल्याचं सांगितलं. पण तीन कॅटेगिरीचा उल्लेख न करता आपलं बोलणं सुरू ठेवलं.

मी विद्यार्थ्याला विचारलं…

मी विद्यार्थ्यांच्या मनातील गोष्ट सांगत आहे. विद्यार्थी सत्याच्या मागे धावत आहे. गांधीजी म्हणाले होते, घराचे दरवाजे आणि खिडक्या सर्व प्रकारांच्या हवेसाठी उघडे ठेवले पाहिजे. मी विद्यार्थ्यांना विचारलं इडियटबाबत तुमचं मत काय आहे? जे विद्यार्थी नाहीत, त्यांच्याबाबत काय म्हणणं आहे? विद्यार्थी म्हणाले, स्टुडंट नेहमी अभिमानाने सत्यासोबत असतात. दुसऱ्या प्रकारचे लोक इमेजची चिंता करतात. इडियट फक्त त्याच्या देवाला मानतात. त्यासाठी आपली इमेज बनवण्याचा प्रयत्न करतो, असं राहुल गांधी म्हणाले.

विद्यार्थ्यांना माहीत आहे…

माझं काही विद्यार्थ्यांशी बोलणं झालं. त्यांनी एक दृष्टीकोण दिला आहे. मी एका मुलीला विचारलं तू विद्यार्थीनी आहेस, याचा अर्थ काय आहे? तिने अत्यंत सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली, ज्याचा मेंदू खुला असतो, आपल्याला काहीच माहीत नाही, हे तो जाणतो, त्यालाच विद्यार्थी म्हणतात. अध्यक्ष महोदय, याचाच अर्थ विद्यार्थ्यांना कळतंय जग बदलत आहे, असं त्यांनी सांगितलं.

मोदींमध्ये हिंमत नाही

आज लोकसभेत चर्चा सुरू आहे. पण पंतप्रधान सभागृहात नाहीये. मोदींमध्ये सभागृहात बसण्याची हिंमत नाहीये. सभागृहात येऊन बसायची हिंमत नाहीये, असा हल्लाच राहुल गांधींनी चढवला. केंद्रीय गृहमंत्रीही सभागृहात का नाहीये? असा सवाल त्यांनी केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in