• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला… एकनाथ शिंदेंची एका वाक्यातच प्रतिक्रिया

September 3, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातील गणेशोत्सवामधील डीजेच्या वापराविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधत असताना, टिळक रोड परिसरात एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. विद्यानंद बापट पुणेकरांच्या विरोधात भूमिका घेतात, असा आरोप करत हल्लेखोराने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हल्लेखोर कोण होता, त्याच्या हल्ल्यामागे नेमके काय कारण होते, तसेच बापट आणि हल्लेखोर यांच्यात जुने वाद होते का, या सर्व बाबींचा शोध पोलीस घेत आहेत. याबबात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारताच त्यांनी स्पष्ट भुमिका मांडली.

प्रसंगाने त्यांनी गणेशोत्सवाच्या संदर्भात एक महत्त्वाचा संदेश दिला. गणेशोत्सव ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. याला कुठेही गालबोट न लागता ती जपली पाहिजे. नागरिकांना त्रास होईल किंवा त्यांची गैरसोय होईल असे कोणतेही काम कुणीही करू नये, अशी सरकारची आणि आपली भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IMD Weather Update : कोकण, मराठवाडा, विदर्भ… महाराष्ट्राच्या या भागाला पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा अंदाज आला
  • Yasin Malik : मला मृत्यूदंड द्या! सरला भट प्रकरणातल्या यासीन भटची अजब मागणी, प्रतिज्ञापत्रात नेमकं काय?
  • Today Horoscope : 4 राशींना आयुष्यात सगळं मिळणार, स्वप्न होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य काय?
  • EPF vs NPS: महिन्याला 10,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर निवृत्तीनंतर कशात जास्त पैसा ?
  • आशिया कप स्पर्धेत स्मृती मंधानाचं झंझावाती शतक, एका झटक्यात दोन विश्वविक्रम मोडले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in