• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘विजय अभिनेता म्हणून चांगला, पण माणूस..,’ पाटकर यांच्या आरोपावर मेघराज भोसले यांचे उत्तर

May 24, 2026 by admin Leave a Comment


मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते विजय पाटकर यांनी या निवडणूकीत आपल्याला उमेदवारी अर्ज भरु दिला नाही असा आरोप केला आहे. एका मंत्र्याचा ओएसडी कोल्हापूरात तळ ठोकून आहे, त्याच्या हातात या निवडणूकीची सूत्रे गेल्याचा आरोपही पाटकर यांनी केला आहे. तसेच महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावरही अभिनेते विजय पाटकर यांनी थेट आरोप केले आहेत. मात्र, आता मेघराज भोसले यांनी विजय पाटकर यांच्यावर आरोपाला उत्तर दिले आहे.

मेघराज भोसले यांनी विजय पाटकर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मेघराज भोसले यांनी म्हटले आहे की, ‘विजय पाटकर यांनी माझ्यावर आज अनेक आरोप लावले आहेत. पण अभिनेता म्हणून हा माणूस चांगला आहे, पण माणूस म्हणून किती खालचा आहे त्यांनी आज दाखवून दिले आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढविली पाहिजे असे मी त्यांना सांगण्यासाठी कॉल केला होता. पण त्या गोष्टीला त्यांनी चुकीचे समजले आणि मी घाबरलो आहे निवडणुकीला असे त्यांना वाटल आहे. पण मी गेली ५ वर्षे अध्यक्ष असताना जेवढी कामे झाली आहेत. तेवढी कामे ही गेल्या ५५ वर्षात या महामंडळात झाली नाहीत असेही मेघराज भोसले यांनी म्हटले आहे.

विजय पाटकर हे महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी फक्त पिक्चर मिळवले, त्यापलीकडे जाऊन त्यांनी काही काम केले नाही आणि माझ्यावर ते खोटे -नाटे आरोप लावत आहेत. त्यांना हे शोभत नाही आणि माझ्यावर कोणत्या भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत त्यांनी दाखवून द्यावे, उलट त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, त्यामुळे त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले असे मेघराज भोसले यांनी म्हटले आहे. आणि यांना कोणी अडवले होते निवडणुकीत फॉर्म भरायला, पण कोणत्या तरी मंत्र्याच्या ओएसडीचा दबाव होता हे खोटे बोलणे काही योग्य नाही असेही मेघराज भोसले यांनी म्हटले आहे.

विजय पाटकर यांचे आरोप काय ?

मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत आपण उमेदवारी अर्ज भरून कोल्हापूरला पाठवला होता, मात्र राजकारण करून काही लोकांनी माझा उमेदवारी अर्ज भरू दिला नाही, असा आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी केला आहे. तसेच महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी गेल्या दहा वर्षात महामंडळाचं अक्षरश: थडगं करून ठेवले आहे. त्यांनी सात महिने कर्मचाऱ्यांना पगारदेखील दिला नाही. उलट त्यांनी आपल्याला फोन करुन माझ्या पॅनलमधून उभे राहा. पण यांना लाज कशी वाटत नाही? मी काय माती खाल्ली आहे का, त्यांच्या पॅनलमधून उभा राहायला असा त्रागा पाटकर यांनी केला आहे. तब्बल दहा वर्षांनंतर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक होत आहे.या निवडणूकीसाठी एकूण 60 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यातून 17 उमेदवार निवडले जाणार आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेनंतर कांदाही महागला, पण या App वर मिळतोय सर्वात स्वस्त कांदा, 1 किलोची किंमत फक्त…
  • Sachin Ahir : ‘हिम्मत कशी होते? यापुढच्या काळात..’ माझगावमध्ये गणेश मिरवणुकीवर अंड फेकण्याच्या घटनेवर सचिन अहिर यांचं रोखठोक भाष्य
  • तीन दिवसानंतर काय होणार? नवं संकट डोक्यावर? हवामान खात्याचा अंदाज काय?
  • Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
  • लाखो चाहत्यांची क्रश, हानिया आमिरच्या त्या व्हिडीओमुळे एकच खळबळ, चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in