• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्याची मागणी

July 23, 2026 by admin Leave a Comment


गुजरातला पावसाने मोठा तडाखा दिला आहे. नालासोपारा, पालघर, डहाणू आणि शेजारी वापी येथे पावसाने पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईच्या रहिवासी असलेल्या पूजा पाटील यांचे सहा जणांचे कुटुंब गुजरातच्या वापी येथील पांडोर परिसरात त्यांच्या घरात दोन दिवसांपासून अडकले आहे. आपल्या कुटुंबाची सुटका करण्याची मागणी पूजा पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने गुजरातच्या वापी परिसरात मोठा पूर आला आहे. या पुरामुळे वापीच्या पांडोर येथे मुंबईच्या रहिवासी पूजा पाटील यांचे सहा जणांचे कुटुंब गेली दोन दिवस घरात अडकले असून तेथे गुजरात प्रशासनाचा कोणताही अधिकारी पोहचलेला नसल्याचा दावा पूजा पाटील यांनी केला आहे. आपल्या कुटुंबाला प्रशासनाने वाचवावे अशी मागणी पूजा पाटील यांनी राज्य सरकारला गेली आहे. आपले नातेवाईक गेल्या दोन दिवसांपासून अन्नपाण्यावाचून घरात अडकले आहेत. दोन दिवसांपासून मदतीसाठी गुजरात प्रशासनाला फोन करूनही अद्याप मदत पोहोचली नसल्याचा दावा पूजा पाटील यांनी केला आहे.

हेलिकॉप्टरने तातडीने रेस्क्यू करा..

घरात अडकलेल्या आपल्या नातेवाईकांना दोन दिवसांपासून जेवणाचीही व्यवस्था नसल्याचे पूजा पाटील यांनी म्हटले आहे.या परिसरात बोटीद्वारे बचावकार्य करणे धोकादायक असल्याने हेलिकॉप्टरच्या मदतीने तातडीने रेस्क्यू करण्याची मागणी पूजा पाटील यांनी प्रशासनाला केली आहे. माझ्या आई- वडीलांना तातडीने वाचवा हो अशी आर्त हाक पूजा पाटील यांनी गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही सरकारना केली आहे.

शाळांना सुट्टी जाहीर

गुजरातच्या वलसाड भागात मुसळधार पावसाचा जोर कायम असून गुरुवारी ३५ प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस पुराच्या पाण्यात अडकली होती. सुरतहून महाराष्ट्राकडे जात असताना ही बस खोल पुराच्या पाण्यात बंद पडली आणि रस्त्याच्या ममधोमध ही बस अडकून पडल्याने प्रवाशांची सुटका करण्यासाठी पालिका प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत त्यांची सुटका केली आहे. पालघर जिल्ह्यातील दोन तालुक्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
  • ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in