• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती

August 1, 2026 by admin Leave a Comment


वाईतील महागणपती मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत कृष्णा नदीचे पाणी पोहोचले आहे. मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून मंदिर परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मंदिराच्या आसपास मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दृश्य समोर आले आहे.

वाई शहरातील प्रसिद्ध महागणपती मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. नदीला आलेल्या पुरामुळे मंदिराच्या परिसरात पाणी शिरले असून मंदिराच्या पायापर्यंत पाणी पोहोचल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

पाणी मंदिरातील ढोल्या गपपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाप्पाच्या पाया पर्यंत पोहचलं आहे तरी या मंदीरात नित्यनेमाने आरती करण्यात आली. पूरस्थिती निर्माण झाली असतानाही मंदिरातील धार्मिक विधींमध्ये खंड पडलेला नाही. मंदिरामध्ये विशेष आरती करण्यात आली. पाणी मंदिराच्या जवळपर्यंत आले असतानाही धार्मिक परंपरा जपण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे या घटनेचा व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. मंदिर परिसरातील परिस्थिती पाहता भाविकांनीही सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले
  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in