• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वरातीत मनसोक्त नाचले, धुमधडाक्यात लग्न लावलं, पण वाटलं नव्हतं ते परत कधीच… भीषण अपघातात पाच ठार; भंडाऱ्यात हळहळ

April 24, 2026 by admin Leave a Comment


लग्नाच्या वरातीत मनसोक्त नाचले. रात्रभर जागून मेहंदी काढली. गाणी म्हटली. धुमधडाक्यात लग्न लावलं. नवरा नवरीला आशीर्वाद दिला. त्यानंतर आपल्या गावाकडे परतण्यासाठी निघाले. पण ते गावी पोहोचलेच नाही. मध्येच घात झाला. भीषण अपघातात लग्नाहून परतणाऱ्या या वऱ्हाडींचा मृत्यू झाला. पाच जण या अपघातात ठार झाले. त्यात चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या घटनेमुळे भंडाऱ्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. भंडारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी पंचनामा केला. या अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथे ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. कोंढा कोसरा येथून लग्न समारंभ आटोपून वऱ्हाड परत येत असताना भरधाव अज्ञात ट्रकने मारुती व्हॅनला जोरदार धडक दिली. या अपघातात चार महिलांसह एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. काल रात्री हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मृतांची ओळखही पटवण्यात आली आहे.

कसा झाला अपघात?

लग्न आटोपल्यानंतर सर्वजण मारूती ओमनी व्हॅनने पवनीच्या दिशेने येत होते. मात्र अज्ञात ट्रकने ओमनीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की ओमनीचा टायर फुटला आणि जागीच चक्काचूर झाला. त्यामुळे कारमध्ये असलेल्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील जखमींनी जोरदार टाहो फोडला. आक्रोश आणि किंकाळ्या ऐकून गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन लगेच मदतकार्यास सुरुवात केली. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांना तातडीने पाचारण करण्यात आले. ट्रकचा चालक फरार झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पुण्यातही अपघात

दरम्यान, पुण्यातील वनाज चौकात पीएमपीएलचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला आहे. स्मिता एक्सपोर्टस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या समोर पीएमटी गाडीने महानगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाडीला पाठीमागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. जोरदार धडक लागल्याने कचरा वेचण्यासाठी गाडीवर बसलेला कामगार उडून खाली पडून गंभीर जखमी झाला आजखमी झालेल्या व्यक्तीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दादरलाच आहात मग घरी येऊन जा..; राज ठाकरेंचा समीर चौघुलेंना अनपेक्षित फोन अन्..
  • IRS ऑफीसरच्या मुलीवर बलात्कार अन् हत्या , 90 टक्के मिळवणारा राहुल कसा बनला खुनी ?
  • PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकात्यातील हुगळी नदीत नौकविहार, व्हायरल व्हिडीओने रोखल्या नजरा
  • रुग्णायलात उपचार नाही तर, तंत्र-मंत्र विद्या… खोदलेल्या खड्ड्यातून असं काही समोर आलं ते, पाहून सर्वच थक्क
  • यापेक्षा वाईट काहीच नाही, प्रेग्नंसी टेस्ट, चुकीचा स्पर्श..; अभिनेत्रीने सांगितला तुरुंगातील धक्कादायक अनुभव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in