• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IRS ऑफीसरच्या मुलीवर बलात्कार अन् हत्या , 90 टक्के मिळवणारा राहुल कसा बनला खुनी ?

April 24, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीच्या अमर कॉलनीत एका आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्या अधिकाऱ्याच्या घरात आधी काम करणाऱ्या नोकरानेच, आरोपी राहुल मीनाने हा नृशंस गु्न्हा केला. मात्र त्याची ही केवळ एका गुन्ह्यापुरती मर्यादित नाही, तर एका हळूहळू वाढणाऱ्या व्यसनाची आहे. प्राथमिक माहितीनुसार, ऑनलाइन गेमिंग आणि सट्टेबाजीच्या व्यसनाने राहुलच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. पैसे मिळवण्यासाठी त्याने आपली मार्कशीट देखील गहाण ठेवली आणि त्यानंतर ऑनलाइन गेम खेळून पाच लाख रुपये जिंकले.

कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल मीना हाँ फक्त एक सामान्य विद्यार्थी नव्हता, तर तो अभ्यासात खूप हुशार होता. दहावीत त्याला 73टक्के तर 12 वीत चक्क 90 टक्के गुण मिळाले होते. मात्र, बारावीनंतर हा मुलगा मोबाईल गेम्समध्ये, विशेषतः ‘तीन पत्ती’ आणि ‘लुडो’ सारख्या ॲप्समध्ये इतका रमून गेला की, त्याचं प्राधान्य हळूहळू बदललं.

गेमची आवड बनली व्यसन

सुरुवातीला, राहुलसाठी ऑनलाइन गेमिंग हा केवळ वेळ घालवण्याचा एक मार्ग होता. मित्रांसोबत गेम खेळणं आणि छोटी मोठी पैज लावणं हे त्याला सामान्य वाटायचं,पण हळूहळू त्याने लावलेल्या पैशांची रक्कम वाढू लागली आणि गेमिंगची जागा जुगाराने घ्यायला सुरुवात केली. त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, राहुल सुरुवातीला लहान रक्कम हरला, मग त्याने पैसे उधार घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर पैसे उभे करण्यासाठी तो त्याच्या वस्तू विकायला लागला. मोबाईल फोन, बाईक आणि घरातील वस्तूही त्याने पणाला लावल्या होत्या. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जास्त पैसे उभे करण्यासाठी आणि झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्याने आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या मार्कशीटही गहाण ठेवल्या होत्या.

एकदा जिंकला 5 लाख, नंतर..

एवढंच नव्हे तर तपासात असेही उघड झाले की, काही काळापूर्वी राहुलने ऑनलाइन गेमिंगमधून अंदाजे पाच लाख रुपये जिंकले होते. मोठी रक्कम जिंकल्यानंतर, त्याला वाटले की तो खेळात एकदम प्रवीण झाला आहे, आणि तो सातत्याने पैसे कमवू शकतो. मित्रांच्या आग्रहावरून, तो त्यांच्या आयडी आणि फोनचा वापर करून खेळ खेळू लागला. या काळात त्याने बरीच मोठी रक्कम गमावली. मग पैसे परत करण्यासाठी त्याच्यावरचा दबाव वाढला.

दिल्लीत नोकरी, पण व्यसन सुटेना

दिल्लीत आल्यावर आरोपी राहुल याला एका आयआरएस अधिकाऱ्याच्या घरी काम मिळालं होतं. त्याला ही नोकरी त्याच्या नातेवाईकांच्या माध्यमातून मिळाली होती. त्याने त्या अधितकाऱ्याच्या घरी सुमारे वर्षभर काम केलं. मात्र, त्याच्या सवयी तशाच राहिल्या. मोबाईल गेम्स खेळणे आणि त्यात पैसे गुंतवणे हा त्याच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने जवळपासच्या दुकानदारांकडून आणि इतर व्यक्तींकडून पैसे उधार घ्यायला सुरुवात केली. मात्र पैसे परत न केल्याने वाद वाढू लागले. अखेर, एका तक्रारीनंतर त्या अधिकाऱ्याने त्याला कामावरून काढून टाकलं.

सुमारे दीड हिन्यापूर्वी राहुल, त्याच्या गावी राजगड यथे परतला. मी सुट्टीवर आलोय आणि माझ्या जागी दुसरा मुलगा काम करतोय, असं त्याने सांगितलं. पण गावी परतल्यानंतरही त्याच्या सवयी बदलल्या नाहीत. तो ऑनलाइन गेम्स खेळतच राहिला. दरम्यान, मित्रांकडून घेतलेल पैसेही तो हरला, त्यानतर पैसे परत करण्याचा दबाव वाढू लागला. आणि हाच दबाव त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

पैशांच्या गरजेमुळे आखली गुन्ह्याची योजना

याच आर्थिक दबावाखाली असलेल्या राहुलने दिल्लीला जाऊन चोरी करण्याचा कट रचला होता, असं तपासात समोर आलं. दिल्लीत पूर् तोवी ज्या घरात काम करत होता, त्या घराची त्याला संपूर्ण माहिती होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो याच चोरीच्या योजनेनुसार दिल्लीला गेला होता. पण पुढे जे घडले, त्यामुळे ती फक्त चोरी न राहता एक नृशंस गुन्हा घडला. त्

राहुलच्या कुटुंबीयांनी असा दावा केला की, त्याला ऑनलाइन गेमिंगचे व्यसन होते आणि त्यामुळे तो भरकटला. राहुल इतका गंभीर गुन्हा करेल अशी त्यांना कधीच अपेक्षा नव्हती, असेही ते म्हणाले. त्यांच्या दाव्यानुसार, तो स्वभावाने शांत होता, पण घरात पैशांवरून त्याचे अनेकदा वाद व्हायचे. जर त्याने हा गुन्हा केला असेल तर त्याला कायद्यानुसार शिक्षा व्हायलाच पाहिजे, यावर घरचे ठाम आहेत.

तपास यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुलचं वर्तन आक्रमक आणि अस्थिर होते. गावात त्याची प्रतिमा चांगली नव्हती आणि तो वारंवार वादांमध्ये सापडायचा .



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Arvind Kejriwal Tweet | भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
  • Mumtaz : महिला त्या हिरोच्या शरीराकडे आकर्षित व्हायच्या, पण आमच्या दोघांमध्ये..अभिनेत्री मुमताज यांनी जाहीरपणे जे होतं ते सांगितलं
  • ‘राईट मॅन इन राँग पार्टी’, राघव चढ्ढा यांच्या एका निर्णयाने केजरीवालांची झोपच उडाली
  • ऐकायला कमी येतंय, आहारात या पदार्थांचा समावेश करा दिसून येईल फरक
  • भारतापुढे सर्वात मोठं संकट, एका निर्णयामुळे हजारो कोटी बुडणार… 60 टक्के व्यापार संकटात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in