• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वरळी पासून अलिबाग पर्यंत… सर्वत्र पसरलीये विराट – अनुष्काची संपत्ती, प्रत्येक घराची किंमत अवाक् करणारी

July 28, 2026 by admin Leave a Comment


Virat Kohli Anushka Sharma Property : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली फक्त त्याच्या खेळामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची जोडी झगमगत्या विश्वातील पॉवरफूल जोडी म्हणून ओळखली जाते. दोघे फक्त क्रिकेट आणि अभिनय विश्वातून कमाई करत नाहीतर, रियल एस्टेटच्या दुनियेत देखील दोघांनी मोठी गुंतवणूक केली आहे. नुकताच, विराट – अनुष्का यांनी मुंबईतील वर्सोवा येथे 18.29 कोटी रुपयांचं आलिशान घर घेतलं आहे. हे घर सी-फेसिंग असून फक्त मुंबई नाही, अनेक ठिकाणी त्यांची आलिशान घरं असून त्यांची किंमत अवाक् करणारी आहे.

मुंबईतील वर्सोवा येथे विराट – अनुष्का यांचं 18.29 कोटी रुपयांचं आलिशान घर

रिपोर्टनुसार, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या रियल एस्टेट पोर्टफोलियो आणखी एका घराची भर पडली आहे. दोघांनी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा भागात असलेल्या ‘गोदरेज स्कायशोर’ प्रोजेक्टमध्ये 18.29 कोटी रुपये किमतीचा सी – फेसिंग अपार्टमेंट खरेदी केला आहे. 2 हजार 644 चौरस फूट क्षेत्रफळात घर पसरलं असून तीन कव्हर्ड पार्किंगच्या जागांचा समावेश आहे. या प्रॉपर्टीची नोंदणी जुलै 2026 मध्ये करण्यात आली असून, यासाठी दोघांनी 1.09 कोटी रुपये स्टाम्प ड्यूटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरले आहे.

वरलीमध्ये विराट – अनुष्काचं सी – फेसिंग अपार्टमेंट

मुंबईतील वरळी सारख्या पॉश परिसरात देखील दोघांनी आलिशान घर खरेदी केलं आहे. ओमकार 1973 टॉवरच्या 35 व्या मजल्यावर 4 बेडरुम असलेलं दोघांचं घर आहे. हे घर जवळपास 7,171 चौरस फूट क्षेत्रफळात घर पसरलं आहे. 2016 मध्ये दोघांनी हे घर खरेदी केलं होतं. ज्यासाठी त्यांनी 34 कोटी रुपये मोजले होते. पण मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की, विराटने स्वतःच बुकिंग रद्द केली.

कोहली याच्याकडे गुरुग्राम येथे देखील पॉश DLF फेज 1 मध्ये जवळपास 10 हजार चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेलं घरं आहे. ज्याची किंमत 80 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. या घरामध्या प्रायव्हेट स्विमिंग पूल, मॉर्डन जीम आणि अधुनिक सुविधा आहेत. गेल्या काही वर्षांत, विराट आणि अनुष्का शर्मा यांनी मुंबई आणि इतर शहरांमध्ये आलिशान निवासी मालमत्तांचा एक प्रभावी पोर्टफोलिओ उभारला आहे.

आता कुठे राहतात विरुष्का?

‘द टेलीग्राफ’च्या रिपोर्टनुसार, विराट आणि अनुष्का सध्या लंडन येथील नॉटिंग हिल परिसरात राहतात. दोघांच्या या पत्त्याबद्दल देखील अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. सांगायचं झालं तर, अलिबागमध्ये देखील दोघांनी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. जानेवारी 2026 मध्ये, दोघांनी अलिबाग येथील आवास बीच जवळील झिराड गावात 37.86 कोटी रुपयांना एकरांहून अधिक जमीन खरेदी केली. त्याआधी, 2022 मध्ये त्यांनी अलिबागमध्येच 19 कोटी रुपयांना 8 एकरांचा प्लॉट देखील खरेदी केलेला. त्यांनी या जागेवर एक अतिशय सुंदर आणि आलिशान व्हिला उभारला असून, त्यात Temperature Controlled स्विमिंग पूल, जकूझी, माठं गार्डन आणि मॉर्डन किचन यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 99 टक्के लोकांना माहिती नाही बेडवरची गादी किती वर्षांनी बदलावी?
  • पुढचे 17 तास धोक्याचे… 23 राज्यांवर मोठं संकट, 80च्या स्पीडने… IMD ची मोठी अपडेट काय?
  • फोटो, इमेज आणि पिक्चर याचा अर्थ एकच होतो का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? जाणून घ्या तिन्हींमधला फरक
  • IND vs SL: सोनलने टीम इंडियाला झुंजवलं! तिसऱ्या दिवशी काय झालं? फॉलोऑनचं गणित सुटणार का?
  • ‘दीदी जिथे, आम्ही तिथे’ बंडखोरांकडे पाठ, हा आमदार ममता बॅनर्जींच्या खेम्यात, सुप्रीम नोटीस, पारडे पलटणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in