• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत बांग्लादेश करणार उलटफेर! या तीन खेळाडूंची दिग्गज संघांना धास्ती

June 12, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी अजून एका वर्षांचा अवकाश आहे. असं असलं तरी या स्पर्धेत सहभागी होणारे संघ तयारीला लागले आहेत. भारतीय संघही शुबमन गिलच्या नेतृत्वात तयारीला लागला आहे. एका मिडिया रिपोर्टनुसार, आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा 4 ऑक्टोबर 2027 ते 21 नोव्हेंबर 2027 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत जेतेपद मिळवण्याची टीम इंडियाची धडपड आहे. मागच्या पर्वात ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत भारताला पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे कोट्यवधि भारतीयांचं स्वप्न भंगलं होतं. आता पुढच्या तयारीला संघ लागला आहे. पण बांग्लादेश संघाची वनडे मालिकेतील कामगिरी पाहून अनेक दिग्गज संघांना घाम फुटला आहे. कारण बांग्लादेश संघात उलटफेर करण्याची ताकद आहे आणि त्यांनी तसं केलं आहे. 2007 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताला याचा चांगला अनुभव आहे. आताही बांग्लादेश संघ वेगळा दिसत आहे. बांगलादेशने वनडे मालिकेत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला मात दिली आहे. पण या विजयाचं कारणंही वेगळं होतं. तसेच या संघात बांगलादेशचे तीन खेळाडू खास आहेत.

बांगलादेशचा विजय वेगळा कसा?

बांग्लादेश संघ आपल्या देशातील सामन्यात फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्ट्या तयार करून काही सामन्यात विजय मिळवत होती. आयसीसी स्पर्धांमध्ये बांगलादेशच्या या रणनितीची पोलखोल झाली आहे. त्यामुळे बांगलादेशवर अनेकदा टीकाही झाली आहे. पण यावेळी बांगलादेशने वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांवर विजय मिळवून दाखवला आहे. आपल्या वेगवान गोलंदाजांच्या जोरावर हा विजय शक्य झाला आहे. वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सारख्या संघांना बांगलादेशने मात दिली. या विजयात बांगलादेशचे तीन वेगवान गोलंदाज महत्त्वाचे ठरले. त्यांनी वेग, स्विंग, बाउंस आणि व्हेरिएशनच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना अडचणीत आणलं. तस्कीन अहमद, मुस्तफिझुर रहमान आणि नाहिद राणा यांनी वेगवान गोलंदाजीचा दणका दिला आहे.

नाहिद राणा हा 23 वर्षांचा असून 6 फूट उंच आहे आणि 150 किमी प्रतितासाने चेंडू टाकण्याची क्षमता आहे. त्याने कसोटी आणि वनडे सामन्यात आपल्या वेगवान गोलंदाजीने कमाल केली आहे. त्याने 12 कसोटी आणि 13 वनडे सामन्यांच्या करिअरमध्ये 4 वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा असलेल्या दक्षिण अफ्रिकेत नाहिद राणा प्रतिस्पर्धी संघांची डोकेदुखी ठरू शकतो. तर तस्कीन अहमद आणि मुस्तफिझुर रहमान यांच्याकडे चांगला अनुभव आहे. या दोघांनी बांगलादेशसाठी चांगली कामगिरी केली आहे. तस्किन नवा चेंडू वेगाने टाकण्यासह स्विंग करण्यात तरबेज आहे. तर मुस्तफिझुर रहमानच्या गोलंदाजी या दोघांच्या तुलनेत कमी वेग आहे. पण अचूक टप्पा आणि व्हेरिएशनमुळे फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. त्यामुळे बांगलादेशने या तीन गोलंदाजांच्या जोरावर दक्षिण अफ्रिकेत कमाल केली तर आश्चर्य वाटायला नको.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in