• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वनडे क्रिकेटमधील 5000 सामन्यांचा प्रवास, भारताची विक्रमी पकड! सचिनचा धावा ते रोहित-विराटचा रेकॉर्ड

August 8, 2026 by admin Leave a Comment


पुरूषांच्या वनडे क्रिकेट फॉर्मेटमध्ये एक मैलाचा दगड गाठला गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 वनडे सामने खेळले गेले आहेत. वनडे क्रिकेटच्या जन्मापासून आतापर्यंत 5000 वनडे सामने खेळले गेले आहेत. 50 वर्षांच्या कालावधीत हा पल्ला गाठला गेला आहे. या वनडे फॉर्मेटच्या 5000 सामन्यात झालेल्या विक्रमांची आकडेवारी काढली तर भारताचा वरचष्मा आहे. भारतीय फलंदाजांनी वनडे क्रिकेट फॉर्मेट खऱ्या अर्थाने गाजवला आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीसारख्या दिग्गज खेळाडूंनी भारतीयांची मान गौरवाने उंचावली आहे. भारतीय खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये केलेले विक्रम सहजासहजी मोडणं कठीण आहे. सर्वाधिक धावा ते सर्वाधिक शतकं, सर्वाधिक सरासरी आणि बरंच काही भारतीय फलंदाजांनी केलं आहे. चला जाणून घेऊयात वनड क्रिकेटमधील विक्रमांबाबत…

भारतीय खेळाडूंचा वनडे क्रिकेटमध्ये विक्रमी दबदबा

  1. सर्वाधिक सामने: सचिन तेंडुलकर (463 सामने)
  2. सर्वाधिक धावा: सचिन तेंडुलकर (18426 धावा)
  3. सर्वोच्च धावसंख्या: रोहित शर्मा (264 धावा)
  4. सर्वोत्तम फलंदाजी सरासरी: विराट कोहली (58.59)
  5. सर्वाधिक द्विशतके: रोहित शर्मा (3 वेळा)
  6. सर्वाधिक शतके: विराट कोहली (54 शतके)
  7. सर्वाधिक अर्धशतके: सचिन तेंडुलकर (96 अर्धशतके)
  8. सर्वाधिक चौकार: सचिन तेंडुलकर (2016 चौकार)
  9. सर्वाधिक षटकार: रोहित शर्मा (369 षटकार)
  10. सर्वाधिक वेळा नाबाद: एम.एस. धोनी (84 वेळा)
  11. सर्वाधिक सामनावीर पुरस्कार: सचिन तेंडुलकर (62 वेळा)
  12. सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार: सचिन तेंडुलकर (15 वेळा)

वनडे क्रिकेटमध्ये भारताचा वरचष्मा आहे. इतकंच काय तर यशस्वी भागीदारीचा विक्रमही सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीच्या नावावर आहे. या जोडीने 8227 धावा केल्या असून त्यात 26 शतकी भागीदारी आहेत.

वनडे क्रिकेटमधील मोठे विक्रम

  1. सर्वाधिक बळी: मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका – 534 बळी)
  2. सर्वोत्तम गोलंदाजी स्ट्राईक रेट: मोहम्मद शमी (भारत – 25.8)
  3. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी: चमिंडा वास (श्रीलंका – 8/19)
  4. सर्वोत्तम गोलंदाजी सरासरी: रशीद खान (अफगाणिस्तान – 19.92)
  5. सर्वोत्तम इकॉनॉमी रेट: कर्टली अँब्रोझ (वेस्ट इंडीज – 3.48)
  6. सर्वाधिक ५ बळी: वकार युनिस (पाकिस्तान – 13 वेळा)
  7. सर्वाधिक निर्धाव षटके: शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका – 313 निर्धाव षटके)
  8. सर्वात जलद शतक: एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका – 31 चेंडूंमध्ये)
  9. सर्वात वेगवान स्ट्राइक रेट: शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान – 117.00)
  10. कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने: रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया – 230 सामने)
  11. सर्वाधिक यष्टीचीत: एम.एस. धोनी (भारत – 123 यष्टीचीत)
  12. सर्वाधिक बळी (यष्टीरक्षक): कुमार संगकारा (श्रीलंका – 501 बळी)
  13. सर्वाधिक झेल: ॲडम गिलक्रिस्ट (ऑस्ट्रेलिया – 417 झेल)
  14. सर्वोच्च भागीदारी: ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युअल्स (वेस्ट इंडिज – 372 धावा)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ना दुधाची विक्री, ना पॅकेटचं दूध; भारताच्या या अनोख्या गावाबद्दल माहित्ये का ?
  • ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील अभिनेत्रीचा श्रावणी लूक चर्चेत; हिरव्या साडीतील सौंदर्याने वेधले लक्ष
  • हिंदू की मुस्लिम, भारतात कोणत्या धर्मातील सर्वाधिक महिला नोकरी करतात? आकडा वाचून चकित व्हाल
  • Video: श्रेयस अय्यरसोबत सेल्फी घेताना फॅन काय करून बसला! वैतागणार नाही तर काय करणार?
  • High Court : बायकोला काळी म्हटलं तर शिक्षा होईल का? हायकोर्टाने काय निकाल दिला?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in