• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वजन कमी करण्यासाठी 5 लाभदायक पेय, आरोग्यही राहिल निरोगी…

June 14, 2026 by admin Leave a Comment


आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढलेलं वजन सर्वात मोठी समस्या आहे. अनेकांचं वजन झपाट्याने वाढतं, पण कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्याली लागते… ज्यांना वजन कमी करायचं असतं, ते अनेकदा त्यांच्या व्यायामात आणि आहारात बदल करतात. पण यामुळे अनेकदा तीव्र थकवा येऊ शकतो. कठोर आहाराऐवजी, फिटनेस ट्रेनर अमारा सांगतात की, रात्री झोपण्यापूर्वी काही आरोग्यदायी पेय प्यायल्याने तुम्हाला सहजपणे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. जाणून घ्या झोपण्यापूर्वी पिण्याची 5 पेय, जी अतिरिक्त चरबी कमी करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

रात्री झोपण्यापूर्वी 20 – 30 मिनिटं लिंबाचा रस घातलेलं एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुलभ होण्यास मदत होते. यामुळे पोट फुगणं कमी होतं आणि शरीराची चयापचय क्रिया वाढून वजन कमी होण्यासही मदत होते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी दालचिनी उत्तम आहे. ती भूक कमी करते आणि रात्री झोपेत असताना शरीरातील चरबी करण्यास मदत करते. हे बनवण्यासाठी, एका ग्लास पाण्यात एक चमचा दालचिनीची पूड किंवा एक लहान तुकडा घालून ते पाच मिनिटे उकळवा.

पोटाला आराम देण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी आल्याचा चहा उत्तम आहे. एका ग्लास उकळलेल्या पाण्यात आल्याचा एक छोटा तुकडा म्हणजे बारीक चिरलेला किंवा किसलेला आलं टाका आणि नंतर त्यात ग्रीन टी बॅग भिजवा. त्यानंतर ते गाळून प्या. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होईल.

ऍपल सायडर व्हिनेगर शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकते. एका ग्लास कोमट पाण्यात एक मोठा चमचा ऍपल सायडर व्हिनेगर आणि एक छोटा चमचा किसलेलं आलं मिसळा. झोपण्याच्या 30 मिनिटे आधी हे मिश्रण प्या. हा एक उत्तम हर्बल चहा आहे जो तुम्हाला रात्रीची चांगली झोप लागण्यास मदत करतो. चांगल्या झोपेमुळे शरीरातील चयापचय क्रिया चांगली राहते, जी वजन कमी करण्यासाठी आवश्यक आहे. एका ग्लास कोमट पाण्यात कॅमोमाइल टी बॅग ५ मिनिटे भिजवून तुम्ही हा चहा पिऊ शकता. पण तुम्हाला कोणत्या समस्या असतील तर, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Lock Up Season 2 : सलमान-संजयवरून विचारला नको तो प्रश्न, रितेश देशमुखचा चेहराच उतरला, भडकून म्हणाला..
  • Rohit Sharma-Virat Kohli : परफॉर्म करा हक्काने वर्ल्ड कप टीममध्ये या, फक्त 3 चान्स, रोहित-विराटला ही अग्निपरीक्षा द्यावीच लागेल
  • विधान परिषदेत भाजपकडे पाशवी बहुमत? 78 पैकी किती आमदार?, त्या एका खेळीने अजून संख्याबळ वाढणार
  • ओमराजे निंबाळकर यांनी अगोदर माफी मागावी… ती पोस्ट व्हायरल झाल्याने एकच खळबळ, थेट मुलानेच..
  • ‘देऊळ बंद 2’चा नवा विक्रम; ‘दशावतार’लाही दिली टक्कर, कमावला 152% अधिक नफा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in