
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे 20 जून 2026 रोजी उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्याशी विवाहबंधनात अडकली. त्यापूर्वी मुंबईत रेवतीचा मेहंदी सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला.
या मेहंदी सोहळ्यातील रेवतीच्या खास लूकचे काही फोटो मेकअप आर्टिस्ट आंचल ठक्कर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. मेहंदी सोहळ्यासाठी रेवतीने मल्टिकलर लेहंग्याची निवड केली होती. या लेहंग्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
'डाबिरी काऊचर'चा हा मल्टिकलर भरजरी लेहंगा, त्यावर साजेसं असं गळ्यात चोकर आणि कानातले तिने घातले होते. तिचा हा संपूर्ण लूक अत्यंत आकर्षक आणि सुंदर वाटत होता. या फोटोंमध्ये रेवतीच्या हातावरील मेहंदीनेही नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं.
लेहंग्या आणि दागिन्यांसह मेहंदीचा हा लूक पूर्ण करण्यासाठी रेवतीने हलका मेकअप आणि साधी पण तितकीच आकर्षक हेअरस्टाइल केली होती. यामुळे तिचं हे रुप खूपच देखणं आणि सुंदर दिसत होतं.
सोशल मीडियावर रेवतीच्या या लूकची चांगलीच चर्चा होत आहे. रेवती आणि सारंग यांच्या विवाहसोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि नामवंत राजकीय व्यक्तींची विशेष उपस्थिती पहायला मिळाली.
रेवतीच्या लग्नाला अमिताभ बच्चन, जया बच्चन, रणबीर कपूर, रवी किशन, रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख यांच्यासह अनेक उद्योगपतींनीही हजेरी लावली होती.





Leave a Reply