
Red Ladyfinger Cultivation Tips: अनेक भारतीय घरात भेंडी आवडीने खाल्ली जाते. लहान मुलांना तर भेंडी आवडतेच डब्यासाठीही ही भाजी देण्यात येते. बाजारात भेंडीची वर्षभर मागणी असते. बाजारात हिरवी भेंडी मिळते. तर काही वेळा पांढरी भेंडी मिळते. ही गावरान भेंडी आमटीसाठी चांगली मानली जाते. त्याचवेळी लाल रंगाच्या भेंडीचे मोठे आकर्षण आहे. ती आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. बाजारात तिची मोठी मागणी आहे. मोठ्या शहरातील मॉल, सुपरमार्केट्समध्ये लोक ती अधिक पैसे मोजून खरेदी करतात. लाल भेंडीमुळे शेतकर्यांना मोठा फायदा होतो. हिरव्या भेंडीप्रमाणेच या भेंडीसाठी खर्च येतो. पण कमाईच्या बाबतीत लाल भेंडी हिरव्या भेंडीला मागे टाकते. शेतकऱ्यांसाठी ही भेंडी कमाईचे एटीएम मानले जाते. जमीन जास्त नसेल तर लाल भेंडीचे पिक तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.
अनेक आजारांवर उपाय
लाल भेंडी ही बाजारात येताच हातोहात विक्री होते. त्यामागे तिचे आरोग्यदायी फायदे सुद्धा आहे. यामध्ये अँथोसायनिन नावाचे घटक असतो. हा घटक शरीरात एक दमदार अँटी ऑक्सिडेंट म्हणून काम करतो. हृदयरोगींसाठी ही भेंडी फायदेशीर मानली जाते. तर मधुमेहाच्या रुग्णांसाठी अनेक वैद्यकीय तज्ज्ञ लाल भेंडी खाण्याचा सल्ला देतात. ती पचनक्रियेसाठी सुद्धा चांगली मानल्या जाते. तिच्या आरोग्यदायी फायद्यामुळे लाल भेंडीला मोठी मागणी आहे.
लाल भेंडीत पोषक तत्त्व
याशिवाय लाल भेंडीत मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियम आणि फायबर असते. हती पचणासाठी हलकी असते. शरीराला ताकद देणारी आणि जिभेची काळजी घेणारी म्हणून भेंडीला मोठी मागणी आहे. हिरव्या भेंडीवर रोग पडतो. कीड लागते. मोठ्या प्रमाणावर फवारणी करावी लागते. पण लाल भेंडीला फवारणीचा खर्च कमी येतो. म्हणजे शेतकर्यांच्या खिशावरील रसायनं आणि कीटकनाशकांचा खर्च वाचतो. लाल भेंडी नैसर्गिक घटकांवर अधिक उत्पादन देते. शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो.
हिरव्या भेंडीपेक्षा तिप्पट भाव
कमाईच्या आकेडवारीत हिरव्या भेंडीपेक्षा लाल भेंडी सर्वात पुढे आहे. हिरव्या भेंडीला बाजारात 20 ते 40 रुपये किलो भाव मिळतो. लाल भेंडीला बाजारात, सुपरमार्केट्समध्ये 100 ते 500 रुपये प्रति किलोपर्यंत भाव मिळू शकतो. काशी लालिमा हे वाण तर अवघ्या 45 ते 50 दिवसातच चांगले उत्पादन देते. एका एकरात लाल भेंडीचे जवळपास 40 ते 50 क्विंटल असे बंपर उत्पादन मिळते. कमी पाणी, कमी खर्च आणि मेहनतही कमी असे असेल तरी भाव चांगला मिळत असल्याने हे पीक शेतकऱ्यांसाठी मनी एटीएम ठरते.
Leave a Reply