• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्न नव्हे तर या कारणासाठी दीपिकाचं इस्लाममध्ये धर्मांतर; सहअभिनेत्रीकडून मोठा खुलासा

August 6, 2026 by admin Leave a Comment


‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करने शोएब इब्राहिमशी लग्न करण्यासाठी धर्मांतर केल्याचं म्हटलं जातं. शोएबशी निकाह करण्यासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारून स्वत:चं नाव फातिमा इब्राहिम असं ठेवल्याचं बोललं गेलं. यावर आता सहकलाकार जयती भाटिया यांनी मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जयती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. खुद्द दीपिकाने मला सांगितलं होतं की, धर्मांतर करण्याचा तिचा निर्णय लग्नासाठी नव्हे तर आत्मिक शांतीसाठी होता, असं त्या म्हणाल्या. दीपिका आणि शोएबच्या लग्नावरून अनेकदा ‘लव्ह जिहाद’चीही टीका झाली.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत जयती म्हणाल्या, “ससुराल सिमर का या मालिकेच्या शूटिंगदरम्यानच दीपिका आणि शोएब यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. दीपिका प्रत्येत नात्यात आणि कामात तिचं 100 टक्के देते. जेव्हा ती शोएबसोबत रिलेशनशिपमध्ये होती, तेव्हासुद्धा तिने अत्यंत प्रामाणिकपणे ते नातं जपलं. मालिका संपल्यानंतर त्यांनी काही शोज केले आणि मग लग्न केलं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

दीपिकाच्या धर्मांतराविषयी त्या पुढे म्हणाल्या, “मी दीपिकाला विचारलं होतं की तिने लग्नासाठी धर्मांतर केलं का? त्यावर तिने मला स्पष्ट सांगितलं होतं की, नाही. त्यावेळी ती आयुष्याच्या कठीण काळातून जात होती. ती अजमेर शरीफला गेली होती आणि तिथे तिला आतून वाटलं की हेच करणं योग्य असेल. त्यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला. जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या धर्मात शांती आणि शक्ती मिळत असेल, तर हा पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक निर्णय असतो.”

सोशल मीडियावर अनेकदा दीपिकाला ट्रोल केलं जातं. पतीसाठी तिने तिची स्वत:ची ओळख सोडून दिली, अशी टीका तिच्यावर केली जाते. परंतु जयती यावर सहमत नाहीत. “जेव्हा दीपिका आणि शोएब यांचं रिलेशनशिप सुरू झालं होतं, तेव्हा करिअरमध्ये दीपिका सर्वांत यशस्वी होती. जेव्हा तिला गरज होती, तेव्हा शोएब तिच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला. आज जेव्हा दीपिकाला गरज आहे, तेव्हा शोएब आणि त्याचं संपूर्ण कुटुंब तिच्या पाठिशी आहे. ही समानता नसेल तर मग काय आहे? फक्त धर्मांतर केलं म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की तिने सरेंडर केलं”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दीपिकाला गेल्या वर्षी कॅन्सरचं निदान झालं होतं. सर्जरी झाल्यानंतर ती त्यातून बरी झाली असून सध्या ती इम्युनोथेरेपी घेत आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in