• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्नानंतर पतीच्या व्यसनाबद्दल समजलं, अवस्था पाहून बसलेला धक्का; मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा

April 20, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री शुभांगी अत्रेनं तिच्या करिअरमध्ये विविध मालिकांमध्ये भूमिका साकारल्या, मात्र ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. अंगुरी भाभीच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. परंतु गेल्या काही वर्षांत तिने खासगी आयुष्यात बऱ्यात समस्यांचा सामना केला. काही महिन्यांपूर्वीच तिच्या पूर्व पतीचं निधन झालं. लग्नाच्या 22 वर्षांनंतर तिने 2025 मध्ये पती पियुष पुरेला घटस्फोट दिला होता. एका मुलाखतीत शुभांगी तिच्या वैवाहिक आयुष्यातील अडचणींविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

शुभांगी अत्रेच्या पूर्व पतीचं निधन लिव्हरच्या गंभीर आजारामुळे झालं होतं. दारुच्या व्यसनामुळे त्याचं लिव्हर निकामी झालं होतं. एप्रिल 2025 मध्ये पियुषचं निधन झालं. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शुभांगीने सांगितलं की, लग्नाच्या वेळी तिला पियुषच्या व्यसनाबद्दल माहीत नव्हतं. लग्नानंतर तिला समजलं की पियुषला दारूचं प्रचंड व्यसन आहे. तरीही तिने 22 वर्षांपर्यंत पियुषला समजून घेऊन संसार टिकवण्याचा प्रयत्न केला होता. “मी लग्नाला यशस्वी बनवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. आम्ही 17 वर्षांपर्यंत एकत्र होतो. मी माझ्या कामात इतकी व्यस्त होते की गोष्टी कधी इतक्या बिघडल्या, ते मला समजलंच नाही. माझ्या मुलीला पियुषच्या व्यसनाचा प्रचंड त्रास होऊ लागला होता. कोविडदरम्यान मी स्वत: जेव्हा घरी राहू लागले, तेव्हा सर्वकाही पाहिलं आणि अनुभवलं”, असं तिने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shubhangi Atre (@shubhangiaofficial)

पियुषने 2018 पासून स्टेरॉइड्स घ्यायला सुरुवात केल्याचा खुलासा शुभांगीने पुढे केला. “स्टेरॉइड्ससोबत त्याचं दारुचं व्यसनसुद्धा सुरूच होतं. अचानक एकेदिवशी त्याची तब्येत बिघडली आणि रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला पूर्णपणे दारू सोडण्याचा इशारा दिला होता. तरीही तो सुधारला नाही, तो दारू पितच राहिला. मी समजावूनही गोष्टी न बदलल्याने अखेर मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ही 2020 मधली गोष्ट आहे. दोन वर्षांपर्यंत मी त्याला रिहॅब सेंटरमध्येही घेऊन गेली. परंतु या सर्वच गोष्टींचा नकारात्मक परिणाम माझ्यावर आणि माझ्या मुलीवर पडत होता. घटस्फोटानंतरही मी त्याच्या आर्थिक गरजांची काळजी घेत होती”, असं शुभांगीने सांगितलं.

शुभांगी अत्रे आणि पियुष पुरे यांनी 2003 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगी आहे. 2025 मध्ये शुभांगीने पियुषला घटस्फोट दिला आणि त्याच वर्षी त्याचं निधन झालं होतं.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा; CCTV मध्ये बॉलिवूडचे दोन..
  • Sanjay Raut | …तर मुख्यमंत्र्यांनाही माफी मागावी लागेल, महिला आरक्षणाबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
  • IPL 2026 Rohit Sharma : MI च्या पुढल्या मॅचपूर्वी चाहत्यांसाठी ती बातमी आलीच… रोहित शर्माबाबत मोठी अपडेट काय ?
  • भारतात रशिया युद्धनाैका तैनात करणार, तब्बल 3000 सैनिकही, थेट रशिया आणि भारताने..
  • IMDb वर 9.2 रेटिंगच्या सुपरहिट वेब सीरिजचा नवीन सिझन; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in