• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्नात हेलिकॉप्टरने फुलांचा पाऊस पाडण्यासाठी किती खर्च येतो? काय असते प्रोसेस?

August 5, 2026 by admin Leave a Comment


लग्न ही अशी गोष्ट आहे, जी अनेकांच्या आयुष्यात एकदाच होते. त्यामुळे आपलं लग्न हे कायम आठवणीत राहावं, असाच प्रयत्न केला जातो. त्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. लग्नावर प्रचंड खर्च केला जातो. लग्नात आलेल्या पाहुण्यांना महागड्या खाद्य पदार्थांची मेजवानी दिली जाते. मात्र आजकाल या गोष्टी खूप सामान्य झाल्या आहेत. जवळपास सर्वच जण आपल्या लग्नामध्ये सजावट आणि खाद्यपदार्थांवर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. परंतु यापेक्षा काही तरी हटके करण्याच्या नादात आता त्यात आणखी एक भर पडली आहे, ती म्हणजे लग्नात हेलिकॉप्टरच्या मदतीने फुलांचा पाऊस पाडला जातो, ज्याला पुष्पवृष्टि असंही म्हटलं जातं.

सुरुवातीला होलिकॉप्टरच्या मदतीने लग्नात होणारा फुलांचा पाऊस असं दृष्य केवळ चित्रपटांमध्ये पाहायला मिळालायचं. परंतु आता अनेक कंपन्या या व्यवसायाच्या क्षेत्रात उतरल्या आहेत. अनेक कंपन्यांकडून आता लग्नात हेलिकॉप्टरच्या मदतीने पुष्पवृष्टि करण्याची सेवा पुरवली जाते. मात्र अनेकांना असा प्रश्न पडतो की, यासाठी नेमका किती खर्च येतो आणि याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे. याचा खर्च तुम्ही कोणत्या कंपनीच्या सेवेची निवड करतात त्यावर सामान्यपणे अवलंबून असतो, मात्र या खर्चामध्ये एवढा काही जास्त फरक पडत नाही.

कोण कोणत्या कार्यक्रमात केली जाते पुष्पवृष्टि?

हेलिकॉप्टरने फुलांचा पाऊस हा केवळ लग्नामध्येच केला जात नाही, तर त्याच्यासंबंधित इतर कार्यक्रमामध्ये देखील होतो, जसं की साखरपुड्यामध्ये वधू वरांवर होलिकॉप्टरने पुष्पवृष्टि केली जाते. त्यानंतर रिसेप्शनमध्ये देखील फुलांचा पाऊस पाडला जातो. एखादी मोठी राजकीय रॅली असेल किंवा एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसचं उद्घाटन असेल तर अशा प्रसंगी देखील हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टि केली जाते.

किती खर्च येतो

जर तुम्हाला 10 ते 15 किलो ग्रॅमच्या फुलांचा वर्षाव करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 75 हजार रुपयांपासून ते 1.50 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. जर तुम्हाला त्यापेक्षा अधिक 25 ते 50 किलो फुलांची उधळण करायची असेल तर त्यासाठी 1.50 लाख ते 2.50 लाख रुपये एवढा खर्च येतो. जर तुम्हाला त्यापेक्षा जास्त म्हणजे 100 किलो पर्यंत फुलांची उधळण करायची असेल तर त्यासाठी जवळपास साडतीन लाखांच्या आसपास खर्च येतो.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in