• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं

July 16, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची जोरदार तयारी करत आहे. या स्पर्धेला एका वर्षाचा अवधी शिल्लक असून टीम बांधणी सुरू आहे. या स्पर्धेत खेळण्याची इच्छा रोहित शर्माने यापूर्वीच व्यक्त केली होती. पण आता या स्वप्नांना सुरूंग लागण्याची शक्यता आहे. भारत-इंग्लंड वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवट असण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाने रोहितला स्पष्ट सांगितलं आहे की, त्याला दक्षिण अफ्रिकेत होणाऱ्या वनडे मालिकेत संधी मिळणार नाही. त्यामुळे लॉर्ड्सवरील वनडे सामना त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवटचा सामना असू शकतो. पण हा निर्णय अचानक घेण्याचं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी योग्य नाही का? चला जाणून घेऊयात तीन कारणं

रोहित शर्माला डावलण्याचं पहिलं कारण

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून डावलण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे फिटनेस.. रोहित शर्माने मागच्या एका वर्षात फिट अँड फाईन राहण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. पण तरीही त्याला दुखापतीचा त्रास आहेत. रोहित शर्माला आयपीएल 2026 मध्ये दुखापत झाली होती. त्यात त्याला पुन्हा एकदा हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती. त्यामुळे आयपीएलच्या पाच सामन्यात खेळला नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याच्या खेळण्याबाबत शंका होती.

रोहित शर्माला डावलण्याचं दुसरं कारण

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून डावलण्याचं दुसरं कारण म्हणजे फॉर्म.. रोहित शर्मा या वर्षात वनडे क्रिकेटमध्ये धावा करण्यात अपयशी ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यात फेल गेला. या वर्षी खेळलेल्या 8 डावात त्याने 30.12 च्या सरासरीने 241 धावा केल्या. इतकंच काय तर त्याचा स्ट्राईक रेटही घसरला आहे. रोहित शर्मा कर्णधार असताना पावरप्लेमध्ये 120हून अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा करायचा. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर स्ट्राईक रेट 90पेक्षा कमी झाला आहे.

रोहित शर्माला डावलण्याचं तिसरं कारण

रोहित शर्माला डावलण्याचं तिसरं कारण म्हणजे टीम इंडियाकडे असलेले पर्याय.. भारताकडे यशस्वी जयस्वालसारखा चांगला पर्याय आहे. त्याने मागच्या 6 वनडे सामन्यात दोन शतकं ठोकली आहेत. वनडेत त्याची सरासरी 70पेक्षा अधिक आहे. तसेच इशान किशनही संघात आहे. त्याने याच वर्षी वनडेत पुनरागमन केलं आहे. त्याने 45हून अधिकच्या सरासरीने 1092 धावा केल्या आहे. इतकंच काय तर वनडेत त्याच्या नावावर द्विशतकही आहे. विकेटकीपर फलंदाज असल्याने दक्षिण अफ्रिकेत रेग्युलर कीपर म्हणूनही खेळू शकतो.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in