• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?

August 10, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुली रेवती सुळे यांचा उद्योजक सारंग लखाणी यांच्याशी विवाह 20 जून 2026 रोजी मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा झाली होती.

या विवाह सोहळ्याला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. त्यानंतर 5 जुलै 2026 रोजी पुण्यात रेवती सुळे यांच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमालाही अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

दरम्यान, रेवती सुळे यांच्या लग्नाचे नागपुरातही रिसेप्शन होणार असल्याची चर्चा होती. मात्र, काही कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे आता दिल्लीतील संभाव्य रिसेप्शनची चर्चा सुरू झाली आहे.

दिल्लीमध्ये रिसेप्शन आयोजित केले जाणार असल्यास त्याला देशातील काही बडे नेते उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, दिल्लीतील रिसेप्शनबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shubman Gill: मालिका जिंकल्यानंतरही गिलच्या मनात एक खंत कायम, सामन्यानंतर ‘ती’ एक भीती बोलून दाखवली
  • मोबाईल घेणं आता खिशाला पडणार जड, जाणून घ्या कोणत्या ब्रँड्सनी वाढवल्या फोनच्या किमती
  • नेपाळमधील विनाशकारी पुराचे खरे कारण अखेर पुढे, शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा..
  • Nepal Flood: नेपाळचा आडमुठेपणा काही कमी होईना, भारताची मदत नाकारली, असं का?
  • Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, सरकारकडून मनधरणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in