• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रेखासोबत Kiss सीन… अभिनेता आऊट ऑफ कंट्रोल.. इंटिमेट सीननंतर हतबल रेखा झाल्या सुन्न; आजही या सीनची का होतेय चर्चा?

June 29, 2026 by admin Leave a Comment


हिंदी चित्रपटसृष्टीतील सदबहार अभिनेत्री रेखा या आजही चर्चेत असतात. त्यांची स्टाईल, पेहराव, त्यांची नजाकत, त्यांच्या पोझ, हसणं.. अगदी प्रत्येक गोष्टीची चर्चा असते. 1969 साली आलेल्या ‘अंजाना सफर’ या चित्रपटात अभिनेत्री रेखा आणि विश्वजीत चटर्जी यांनी एकत्र काम केलं होतं. मात्र या चित्रपटापेक्षा, त्यामध्ये असलेल्या वादग्रस्त ‘किसिंग सीन’मुळे (चुंबन दृश्यामुळे) जास्त चर्चा झाली. या दृश्यादरम्यान अभिनेत्याने त्यावेळी अवघ्या 15 वर्षांच्या असलेल्या रेखा यांचे जबरदस्तीने चुंबन घेतलं होतं. या घटनेमुळे रेखा यांना मोठा धक्का बसला आणि त्या अत्यंत अस्वस्थ झाल्या; त्या खूप हादरलेल्या आणि भीतीने थरथर कापत होत्या. खुद्द त्या अभिनेत्याची, विश्वजीत यांची मुलगी, पल्लवी चॅटर्जी हिनेही या किसिंग सीनचा निषेध करत रेखा यांना आपला पाठिंबा दर्शवला होता.

रेखा- विश्वजीत किसींग सीनचा वाद

आता, ज्येष्ठ सिने-पत्रकार ज्योती व्यंकटेश यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हिंदी रश’शी बोलताना हा विषय निघाल्यावर त्यांनी आपलं मत मांडलं. “त्या वेळी रेखा नुकतीच चेन्नईहून आली होती. त्या चित्रपटाचे नाव ‘अंजना सफर’ असं होतं.( त्यासंदर्भात) मला असं समजलं होतं की, दिग्दर्शकाने मुद्दामहून वाद निर्माण करण्याची योजना आखली होती. चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी दिग्दर्शकाने विश्वजीतच्या कानात सांगितल की, ‘या मुलीला ओठांवर किस कर.’ त्यावर विश्वजीत विचारलं, ‘मी तिला गालावर किस करू का?’”

त्यावर दिग्दर्शकाने नकारार्थी उत्तर दिलं – नाही, हा सीनचाच भाग आहे. लिप-टू-लिप kiss करावं लागेल. दिग्दर्शकाने आदेश दिल्यावर विश्वजीत यांनी तसंच केलं. पण त्यामुळे रेखा अगदी हमसून हसमून रडल्या, असं सिनेपत्रकार ज्योती व्यंकटेश यांनी नमूद केलं. त्या दिवशीचं शूटिंग कॅन्सल झालं होतं. मात्र तो किसींग सीन आधीच शूट करण्यात आला होता, तो नंतर चित्रपटात वापरण्यात आलं, असंही त्यांनी सांगितलं.

सलग 5 मिनिटं किस करत राहीला अभिनेता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखाला किस करताना विश्वजीत भान विसरले. कॅमेरा सलग पाच मिनिटे चालूच होता आणि ते तिला किस करतच राहिले, आऊट ऑफ कंट्रोल झाले. मात्र यामुळे रेखा सुन्ना झाल्या होत्या, आपली पसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. पण दिग्दर्शकाने जसं सांगितलं, तसंच मी केलम, असं म्हणत विश्वजीत यांनी अनेक वर्ष स्वत:चा बचाव केला.

बिस्वजीत आणि रेखा यांच्यातील ‘किसिंग’च्या (चुंबन घेण्याच्या) वादाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर, अभिनेत्याची मुलगी पल्लवी हिने त्या घटनेबाबत आपल्या वडिलांवर टीका केली होती. माझ्या वडिलांनी तो (किसींग) सीन करण्यास नकार द्यायला हवा होता किंवा किमान तसे करण्यापूर्वी रेखा यांची परवानगी तरी घ्यायला हवी होती. त्या वेळी रेखा या किशोरवयीन होती. अशा दृश्यांसाठी ती कदाचित तयार नसेल. हा अनुभव तिच्यासाठी नक्कीच धक्कादायक ठरला असणार, असं पल्लवी यांनी म्हटलं होतं.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..
  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in