• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रुग्णांचे हाल, निवासी डॉक्टरांच्या संपाचा मोठा फटका, महाराष्ट्रात कुठे, काय स्थिती जाणून घ्या

August 5, 2026 by admin Leave a Comment


नागपुरातील मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा आज संप आहे. नागपुरातील 1 हजार 500 हून अधिक डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे हजारो रुग्णांचा मनस्ताप सहन करावा लागता आहे. पण संपावेळी आतत्कालीन सेवा, अपघात विभागातील सेवा सुरुच राहणार आहे. संपात सहभागी असलेल्या माडचे नागपूर जिल्हाध्यक्ष गौरव काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आज जो संप पुकारण्यात आला आहे, आजच्या घडीला हा प्रतिकात्मक संप आहे. आमचा मुळ मुद्दा, BHMS डॉक्टारांना सीसीएमपी अर्थात, क्लिनिकली कोर्स इन मॉडल फार्माकोलॉजी हा एक वर्षांचा कोर्स सरकारने 2014 मध्ये काढलेला. त्यानंतर आतापर्यंत हा मुद्दा प्रलंबित होता. आता त्यांनी कंडिशनल रजिस्टेशन महाराष्ट्र मेडिकल कान्सिलमध्ये चालू केलाय आहे. आता सरकारने यावर निर्णय घ्यावा…’, असं देखील गौरव काळे म्हणाले आहेत.

राज्यात आज अनेक ठिकाणी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. BMC रुग्णालयांतील नियमित OPD सेवा आजपासून बंद राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. KEM, नायर, सायन आणि कपूर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी देखील संपाचा निर्णय घेतला आहे. CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांनी MMC नोंदणी देण्याच्या विरोधात डॉक्टरांनी हा संप पुकारला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट पासून डॉक्टरांच्या संपाला सुरुवात झाली आहे. रुग्णाचे हाल होऊ नयेत म्हणून संपाच्या पहिल्या 24 तासात आरात्कालीन सेवा आणि अपघात विभाग अशा जीव वाचवणाऱ्या सर्व सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सरकराच्या भूमिकेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल… असं देखील सांगण्यात आलं आहे.

सांगायचं झालं तर, 3 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार (GR) एक वर्षाचा प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केलेल्या होमियोपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी (आधुनिक वैद्यकशास्त्र) प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाच्या विरोधात डॉक्टरांनी एक दिवसाचा वैद्यकीय सेवा बहिष्कार जाहीर केला आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास तातडीने आणीबाणी सेवा देखील बेमुदत बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in