• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रिल बनवायला गेला, असा कुदला आणि दोन्ही पाय तोडून बसला…मुर्खपणा चांगलाच भोवला!

September 7, 2026 by admin Leave a Comment


आजकाल प्रत्येकजण सोशल मीडिया वापरतो. काही लोक मनोरंजन म्हणून सोशल मीडियावर असतात. तर काही लोक कन्टेंट क्रिएटर म्हणून सोशल मीडियावर काम करतात. वेगवेगळ्या प्रकारचं कन्टेंट तयार करून आजकाल काही लोक महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. परंतु कन्टेंट क्रिएशनचे हेच वेड कधीकधी जीवघेणे ठरू शकते. नेटकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी तसेच आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी काही लोक काहीतरी विचित्र गोष्टी करतात. याचे परिणामही त्यांना भोगावे लागतात. सध्या अशाच एक कन्टेंट क्रिएटर चांगलाच गोत्यात आला आहे. रिल बवण्याच्या नादात त्याने पाण्यात उडी मारली. परंतु उडी घेतल्यानंतर आता तो दोन्ही पाय मोडून बसला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेली ही घटना उत्तर प्रदेशातील झांसी येथील आहे. येथे एका तरुणाने रिल करण्याच्या नादात नको ते केलं. त्यामुळे त्याचे दोन्ही पाय मोडले आहेत. त्याने एका पुलावर उभे राहात खाली नदीच्या पाण्यात उडी घेतली. पण नदीमध्ये पाणी कमी असल्याने त्याचे पाय थेट खाली तळाला लागले. यातच त्याचे दोन्ही पाय मोडले.

उडी घेताच तो थेट नदीच्या तळाशी गेला

ही घटना घडली तेव्हा त्याचे मित्र मोबाईल हातात घेऊन व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. पाय मोडलेला तरूण अगोदर पुलावर उभा राहिलेला दिसत आहे. त्याने कॅमेऱ्याकडे हात करून थेट 30 फुटावरून पाण्यात उडी घेतली. उडी घेताच तो थेट नदीच्या तळाशी गेला. यातच त्याचे दोन्ही पाय मोडले. ही घटना घडल्यानंतर त्याला तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या एका पायात दोन रॉड टाकण्यात आले आहेत. तर दुसऱ्या पायावर ऑपरेशन केले जाणार आहे.

#BREAKING 🚨 Man Fractures Legs Attempting Reel Jump

A 32-year-old man broke both legs after jumping 30 feet into shallow, rocky water at Jhansi’s Pahuj Dam while filming a viral reel. He is currently hospitalized.#Jhansi #UPNews #SafetyFirst @Uppolice @jhansipolice @UPGovt pic.twitter.com/FpICA3QemZ

— jarvis ☠ (@Vishii14) September 7, 2026

दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रिल तयार करण्याच्या नादात, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नको त्या गोष्टी करू नये, स्वत:ला धोक्यात टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CJP चा आणखी एक मोठा विजय, कार्यकर्त्यांकडून जल्लोष
  • तिचं शीर धडावेगळं करून फ्रिजमध्ये ठेवलं, नव्या संसाराचा भयानक अंत; पतीच्या रागाने सगळंच उद्ध्वस्त!
  • आनंदाची बातमी! मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरे, शहरात राहणाऱ्यांसाठी खास योजना
  • शुबमन गिल Vs अभिषेक शर्मा..! सुरूवातीला जोरदार फटकेबाजी, नंतर काढली विकेट, दोन मित्रांचं द्वंद्व
  • अंबानी कुटुंबाचा विषय खोल, या व्यक्तीकडे 1700 हिऱ्यांचे घड्याळ, किंमत वाचून चकित व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in