• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रितेश देशमुखची खास व्यक्तीसाठी काळजाला भिडणारी पोस्ट… रेअर फोटोही शेअर

May 28, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता रितेश देशमुख सध्या खूप चर्चेत आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत सध्या त्याच्याच नावाची चर्चा आहे. त्याला कारण म्हणजे सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा राजा शिवाजी हा सिनेमा आहे. रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. हिंदी आणि मराठीत या सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमात तगडी स्टारकास्ट असून हे सुद्धा या सिनेमाचं एक वैशिष्ट्ये आहे. हा सिनेमा केवळ सिनेमा नव्हता, तर रितेश देशमुखचं एक स्वप्न होतं. ते प्रत्यक्षात साकारलं आहे. या स्वप्नाला हातभार लावणारे असंख्य हात होते. त्यातील एका खास व्यक्तीबद्दल रितेश देशमुख व्यक्त झाला आहे. या व्यक्तीबद्दल रितेश भरभरून बोलला आहे.

रितेश देशमुखने ज्या व्यक्तीसाठी वेळात वेळ काढून पोस्ट लिहिलीय ती व्यक्ती फक्त एक माणूस नसून रितेशसाठी खास आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सिनेमाटोग्राफर संतोष सिवान आहेत. संतोष सिवानसाठी रितेशने खास पोस्ट लिहिली आहे. त्याने या पोस्ट सोबत बिहाइंड द सीन पिक्सही शेअर केले आहेत. त्याने या पोस्टमध्ये संतोष सिवानला मेंटर आणि नॉर्थ स्टार म्हटलं आहे. यावरून संतोष सिवान रितेशसाठी किती खास आहे, हे दिसून येतं.

काय लिहिलं पोस्टमध्ये?

डियर संतोष सिवान सर… सुरुवातीपासूनच तुम्ही माझ्या केवळ स्वप्नांना पाठबळ दिलं नाही तर माझ्या या स्वप्नांना स्वत:चंच स्वप्न असल्यासारखं प्रेमाने आणि विश्वासाने जपलं. अशा प्रकारच्या विश्वासनाने माझ्यासाठी सर्व काही बदलून टाकलं. कारण तुम्ही नेहमीच माझ्यापाठी पहाडासारखे उभे राहिलात. तुम्ही मला नीडर बनण्याची हिंमत दिली. मी भरकटल्यावर, संकटात सापडल्यावर तुमच्या पाठिंब्याने मला योग्य दिशा मिळेल हे माहीत असल्यामुळेच मी मोठ्या रिस्क घेऊ शकत होतो, असं रितेशने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तो पुढे म्हणतो, अनेक वेळा असे क्षण आले, जेव्हा मला फार हेवी झाल्यासारखं वाटलं. त्या प्रत्येकक्षणी तुम्ही माझ्यासोबत होतात, हे मला चांगलंच आठवतंय. तुम्ही हा प्रवास नितांत सुंदर बनवला. तुम्ही आपल्या राजा शिवाजी सिनेमाला जिवंत केलं. हा सिनेमा स्पेशल आणि पर्सनल असल्याचा आनंद तुम्ही दिला. माझे मेंटर, मला दिशा दाखवणाऱ्या माझ्या नॉर्थ स्टारचं मनापासून आभार मानावं तेवढं कमी आहे. मी हृदयापासून तुमच्यावर नितांत प्रेम करतो. तुमची इज्जत करतो. मी नेहमीच तुमचा ऋणी राहील. खूप खूप धन्यवाद आणि प्रेम… तुमचा रितेश.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

राजा शिवाजी हा सिनेमा रितेशने दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात रितेश लीड रोलमध्ये आहे. तर जेनलिया देशमुख त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. या सिनेमात अभिषेक बच्चन, संजय दत्त, भाग्यश्री आणि विद्या बालनची महत्त्वाची भूमिका आहे. तर सलमान खानने कॅमियो रोल प्ले केला आहे. सलमानच्या या छोट्याच्या भूमिकेचं खूपच कौतुक झालं आहे. या सिनेमात रितेशचा 10 वर्षाचा मुलगा राहिल सुद्धा आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in