• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?

July 17, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल हे केंद्रात मंत्रिपद आणि पक्षातील कार्याध्यक्षपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रफुल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद तसेच पक्षातील कार्याध्यक्षपद देण्यास पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी विरोध दर्शवला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षात अंतर्गत नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाशी प्रफुल पटेल यांनी पक्षाच्या स्तरावर चर्चा न करता थेट पत्रव्यवहार केल्यामुळे पक्षातील काही आमदार आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. या घडामोडींमुळे पक्षाच्या नेतृत्वावर अनावश्यक दबाव निर्माण होत असल्याची भावना काही आमदारांनी व्यक्त केल्याचे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील काही आमदारांनी ही नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत पोहोचवली असून, प्रफुल पटेल यांच्या भूमिकेमुळे पक्ष अडचणीत येत असल्याची तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर प्रफुल पटेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार समोर आलेल्या या चर्चांबाबत पक्षाची अधिकृत भूमिका काय असेल, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood: भूकंप, पाऊस की हिमस्खलन.. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराचं खरं कारण समोर
  • Rule Change : LPG ते विमानतळापर्यंत…! 1 सप्टेंबरपासून देशात होणार 5 मोठे बदल, काय काय महागणार?
  • सायबर अधिकाऱ्याने यावेळी घरातून उचललं पण.. समय रैनाच्या टोलेबाजीने मुख्यमंत्र्यांनाही हसू अनावर, Video नक्की पाहा
  • Ankit Baliyan: प्रसिद्ध गायकावर जिमबाहेर झाडल्या 20 गोळ्या; मृतदेह रस्त्यावर ठेवत कुटुंबीयांचा आक्रोश
  • Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्ग कोपला, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर, ही माहिती तयार ठेवा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in