• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राष्ट्रभक्तीचं ढोंग, PM मोदी, अमित शहा सभागृहात नसताना…; संजय राऊत संतापले, सत्ताधाऱ्यांवर पेटले

July 31, 2026 by admin Leave a Comment


लोकसभा आणि राज्यसभेत काल ‘वंदे मातरम’ मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आता संबंधित कायदा अस्तित्वात येण्याचा मार्ग सुकर झालाय. वंदे मातरम विधेयकाला मंजुरी मिळत असताना सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अनुपस्थिती होती, असा विरोधकांनी आरोप केला आहे. सरकारच्या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या गैरहजेरीवरून संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, पेपरफुटीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा झाली.
आम्ही आमची मत तिथे मांडली. मल्लिकार्जुन खरगे यांचं भाषण झालं, त्यांनतर आम्ही बोललो. पंतप्रधान आणि गृहमंत्री सभागृहात बोलत नाहीत. ज्या खात्याचा मंत्री ज्याचा संबध नाही, तो यावर बोलतो. वंदे मातरम विधेयक चर्चेला आलं, तेव्हा पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नसतात. अमित शहा उद्या टिळक पुरस्कार द्यायला जात आहेत. अमित शहा यांच्या हस्ते पुरस्कार देणाऱ्यांच मला कौतुक वाटतं. पुणेकर यांनी याला विरोध करण्याच निर्णय घेतला आहे’.

‘टिळक यांचे वंशज शिंदे गटात आहेत, ते म्हणत आहेत की तर राजकारण आणू नका. अमित शहा कोण आहेत? बाबा आमटे आहेत का? पुणेकर जनता हे मान्य करणार नाही. विधेयकावर चर्चा झाली. सर्व विरोधकांनी आपली मते मांडली. मुलांना मारताना पॅलेट गन वापरली. विद्यार्थी आणि परिक्षांवर बोलण्यासाठी पंतप्रधान गृहमंत्री उपस्थीत नव्हते. वंदे मारतम विधेयकासाठी पूर्ण अधिवेशन घेतले, ते विधेयक चर्चेला आले असताना पंतप्रधान आणी गृहमंत्री शहा सदनात नसतात. केंद्रीय गृहमंत्री उद्या पुण्यात चालले आहेत. लोकमान्य टिळकांसारख्या व्यक्तीचा पुरस्कार अशा माणसाच्या हाताने दिल्याचा घाट घातला जातोय. टिळकांच्या नावाचा बाजार पुणेकर मान्य करणार नाही. जंतरमंतरवर मुलांना मारण्याचा ज्यांनी आदेश दिला, त्यांच्या हाताने हा पुरस्कार दिला जातोय, अशी टीका राऊतांनी केली.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही राऊतांनी टीका केली. ‘त्यांनी ते संशोधन केले आहे. त्यांच्या शोधाबद्दल फडणवीसांनी त्यांची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली पाहिजे.  त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु केले पाहिजे. त्यांना जर हा पुरस्कार दिला नाही, तर देश एका मोठ्या संशोधकाला मुकेल. दादा यांचा दगडाशी जवळचा संबध आहे’, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली. ‘टिळक पुरस्कार हा अजित डोवाल यांना दिला जातोय. हे कसले देशभक्त. आम्ही टिळक भक्त आहोत. त्यामुळं त्यावर आम्ही बोलणार आणि लिहीत राहणार. पुणेकर याला विरोध करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sachin Ahir : ‘हिम्मत कशी होते? यापुढच्या काळात..’ माझगावमध्ये गणेश मिरवणुकीवर अंड फेकण्याच्या घटनेवर सचिन अहिर यांचं रोखठोक भाष्य
  • तीन दिवसानंतर काय होणार? नवं संकट डोक्यावर? हवामान खात्याचा अंदाज काय?
  • Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
  • लाखो चाहत्यांची क्रश, हानिया आमिरच्या त्या व्हिडीओमुळे एकच खळबळ, चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न
  • Abhijit Dipke : अभिजीत दिपकेंचा आणखी एक मोठा विजय, अखेर सरकार झुकलं, घेतला तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in