• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राम मंदिरातील दानावर डल्ला… सरसंघचालक मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया… दोन शब्दात बोलले काय?

July 4, 2026 by admin Leave a Comment


Mohan Bhagwat Reaction: अयोध्येतील रामलल्लाच्या दानपेटीवर विश्वस्त मंडळासह कर्मचाऱ्यांनीच मोठा डाका टाकला. लाखो श्रद्धाळूंच्या श्रद्धेला धक्का बसला. प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे. आठ जणांना अटक करण्यात आलेली आहे. तर चंपत राय आणि इतर दोन विश्वस्तांच्या मागे चौकशीचा ससेमिरा आणि अटकेची टांगती तलवार आहे. काल परवा संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात राम मंदिरातील अपहार हा समाजाच्या श्रद्धेला धक्का असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर याविषयावर सरसंघचालक विश्वस्तांसह सरकारचे कान टोचतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. पण त्यांच्या त्रोटक प्रतिक्रियेने रामभक्तांचा हिरमोड झाला आहे.

दोनच शब्दात विषय आटोपला

माध्यम प्रतिनिधींनी सरसंघचालकांना गरडा घातला. त्यांना राम मंदिरातील दानपेटीतील चोरीवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा पुढे जात भागवतांनी दोनच शब्दात विषय आटोपला. राम… राम, असे दोनच शब्द ते म्हणाले. त्यांच्या या त्रोटक प्रतिक्रियेने राम भक्तांचा हिरमोड मात्र झाला. भागवत राम मंदिरांची कोनशिला आणि मुर्ती प्रतिष्ठापनावेळी हजर होते. इतक्या गंभीर विषयात निदान त्यांनी यंत्रणा, प्रशासनाला खडसावणे अभिप्रेत होते. त्यांनी राम राम असे म्हणत विषय आटोपता घेतला.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची भूमिका समोर

अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावरून देशात तीव्र संताप आहे. त्यावर शुक्रवारी संघाकडून अधिकृत प्रतिक्रिया आली. संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी ही चोरीची घटना अत्यंत दुर्दैवी असून संपूर्ण समाजाच्या आणि रामभक्तांच्या श्रद्धेला धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली. या घटनेने संघ अत्यंत व्यथित झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तपासात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आणि दोषींना शिक्षा देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा आंदोलन

राम मंदिरातील दानपेटी अपहार प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेससह समाजवादी नेत्यांनी भाजपवर तोफ डागली आहे. इकडे मुंबईत उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली आहे. 5 जुलै रोजी दादर येथील हनुमान मंदिरात रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे. राम मंदिरातील पैशावर डल्ला मारून खासदार आणि आमदार फोडण्यासाठी तो पैसा वापरल्याचा गंभीर आरोपही काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in