
अयोध्येतील राम मंदिर येथे झालेल्या कथित चोरीच्या घटनेनंतर अभिनेत्री राखी सावंत हिने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना तिने मंदिरासाठी आपण केलेल्या देणगीची आठवण करून दिली आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
राखी सावंतने सांगितले की, राम मंदिराच्या उभारणीसाठी तिने आर्थिक मदत केली होती. तसेच प्रभू श्रीरामांप्रती असलेल्या श्रद्धेपोटी चांदीची भेट अर्पण केली होती. याशिवाय नवस म्हणून अनेक वस्तूही मंदिरात अर्पण केल्याचा दावा तिने केला.
या चोरीच्या घटनेबाबत बोलताना राखी सावंत म्हणाली, हे चोर माणसांना लुटतात, पण तुम्ही तर रामालाच लुटलंत. मला वाटतं यामागे मोठं रॅकेट काम करत आहे. मात्र अशा प्रकरणांमध्ये लहान लोकांना पुढे करून अडकवलं जातं. खरे सूत्रधार मात्र मोकाट फिरत असतात.
तिने पुढे भावनिक प्रतिक्रिया देत सांगितले की, आजपासून मी कोणताही नवस करणार नाही आणि मंदिरात चढावाही चढवणार नाही. श्रद्धेच्या ठिकाणी अशा घटना घडणं अत्यंत वेदनादायी आहे.
राखी सावंतच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही जणांनी तिच्या संतापाला पाठिंबा दिला असून मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर काहींनी तिच्या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.




Leave a Reply