• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राममंदिर दानपेटी रक्कम चोरी प्रकरणात पहिली मोठी कारवाई, या आठ लोकांवर एफआयआर, घरांवर छापे टाकून अटक

June 25, 2026 by admin Leave a Comment


अयोध्येतील राम मंदिर दान पेटीतील चोरी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीनुसार आता अयोध्या पोलिस ठाण्यात अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, टिन्नू यादव, मनीष यादव आणि अन्य लोकांच्या विरोधात बीएनएस कलम 306, 316 ( 5) आणि 317 (4), 61 आणि 3 (5) नुसार एफआयआर दाखल केला आहे. यासोबतच पोलिसांनी सर्व आरोपींच्या घरावर छापे टाकत सर्वांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात आठ लोकांवर एफआयर दाखल झाला आहे.

चंपत राय किंवा अनिल मिश्रा यांच्या सारख्या बड्या लोकांची नावे नाहीत. यातील राममंदिराचे दानपेटीची कॅश मोजणारे सहा कॅशियर आहेत. एसआयटीच्या तपास अहवालानंतर ही कारवाई झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्हीत प्रत्यक्ष ज्यांचे चोरी करताना चेहरे दिसले किंवा त्यांना ज्यांनी मदत केली त्यांच्यावरच कारवाई कुऱ्हाड कोसळली आहे.

कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे प्रश्न

या प्रकरणात आतापर्यंत केवळ अंतर्गत गडबड आणि विभागीय तपासाच्या स्तरावर कारवाईची आशा केली जात होती. मात्र, एफआयआर दाखल झाल्यानंतर कायदेशीर कारवाईचे चित्र स्पष्ट झाले आहे. हे प्रकरण केवळ पैशांच्या अपहाराचे नव्हे तर थेट रामलल्लाच्या चरणी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दान केलेल्या आणि देशविदेशातील कोट्यवधी हिंदूंची आस्था आणि विश्वासाशी जोडलेले आहे. यामुळे ट्रस्टने यास गंभीरतेने घेतले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरातील दानपत्रातील चोरी संदर्भात समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमात आरोप होत होते. या संदर्भात अनेक धक्कादायक पुरावे आणि कागदपत्रे देखील उघड होत होते. यावरुन निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणानंतर ट्रस्टने स्वत:च एफआयआर दाखल करुन स्पष्ट केले की रामलल्लाच्या खजाना आणि श्रद्धाळूंच्या आस्थेशी कोणालाही खेळू दिले जाणार नाही.

आतील लोकांचा सहभाग ?

या प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर आता हा तपास कोण-कोणत्या मोठ्या हस्तींपर्यंत प्रत्यक्षात पोहचणार आहे हा मोठा सवाल केला जात आहे. कारण आतील लोकांच्या सहकार्याशिवाय ही चोरी होणे अशक्य असल्याचे म्हटले जात आहे. एसआयटी आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईनंतर लवकरच या मोठ्या कटाचा उलगडा होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आता डोमिसाईलची गरज नाही, केंद्राचा मोठा निर्णय
  • सरकार दरबारी ते मृत ठरले,पाटणच्या जाधव यांचे न्यायासाठी ११ महिने मुंबईला खेटे..
  • INDW vs BANW : शफाली वर्माचं चाबूक अर्धशतक, टीम इंडियाचा जबरदस्त विजय, बांगलादेशचा 5 विकेट्सने धुव्वा
  • WT20 WC: भारताने बांगलादेशला 5 गडी राखून नमवलं, विजयानंतर हरमनप्रीत कौरने काय चुकलं? ते सांगितलं
  • EPFO : PF खातेधारकांसाठी मोठी बातमी, 3 दिवस पीएफ क्लेम करता येणार नाही; वाचा तारीख

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in