• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंची नितीन गडकरी यांच्यावर जहरी टीका, थेट म्हटले, गडकरींचे..

July 13, 2026 by admin Leave a Comment


उद्धव ठाकरे यांनी नुकताच सरकारवर जोरदार टीका केली. राम मंदिराच्या मुद्द्यात त्यांनी टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर नितीन गडकरी होते. गडकरींवर उद्धव ठाकरेंनी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, एक आठवड्यापूर्वी भेटलो होतो. हिंदुत्वाच्या नावावर जो लुटीचा कार्यक्रम सुरू आहे. त्याविरोधात आंदोलन पुकारलं होतं. रविवारी शिवसैनिकांनी दादरच्या हनुमान मंदिरासमोर महाआरती केली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. 18 तारखेला नागपूरला कार्यक्रम होणार आहे. मी स्वत: जाणार आहे. हिंदूने झोपून राहू नये, जागं राहिलं पाहिजे. हिंदुचा दुरुपयोग करून लुटण्याचं काम करत असतील तर त्यांना जागा दाखवली पाहिजे. देशात विचित्र परिस्थिती आहे. देशात बऱ्याच वर्षात विरोधी पक्षाला काम आहे. जिथे बोट दाखवू तिथे भ्रष्टाचार आहे. रस्त्यावर खड्डे आहेत. गडकरींचं ते काम आहे. पण ते इथेनॉलवर बोलत आहेत.

पुढे उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मी एका विषयासाठी आलो आहे. लोक बोलत नाहीत. जंतरमंतरवर दीपकेने जो विषय उचलला तो अनेक युवकांच्या भवितव्याचा विषय आहे. नीटचे परीक्षा पेपर फुटले. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. कोणी लक्ष दिले. सरकारला वेळ नाही. खासदार फोडाफोडीकडे त्यांचं लक्ष आहे. विद्यार्थ्यांचं नशीब फुटलं आहे. सोनम वांगचूक आणि दीपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे.

वांगचुक भेटून गेले. त्यांच्या बुद्धिमतेचा वापर केला पाहिजे. 16 दिवसापासून ते आमरण उपोषण करत आहेत. चार दिवसापूर्वी मी अरविंद सावंत यांना त्यांना भेटायला गेले होते. मी त्यांच्याशी फोनवरून बोललो. आंदोलन करू नका. तुमची गरज आहे, असं म्हटलं. पण सरकारला त्यांची गरज नाही. एक एक व्यक्ती गेला तर सरकारला ते पाहिजेच आहे. असं नाईलाजाने म्हणावं लागतंय.

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे. एक क्षण आला आहे, सर्व जणांनी सर्व विषय घेण्याची आवश्यकता नाही. पण एखाद्या विषयावर देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे असं म्हणतोय. पक्षाचे झेंडे घेऊन जावं असं म्हणत नाही. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in